Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री गिरीश महाजनला ‘गेट आऊट’ म्हणणार्‍या महिलेविरोधात तक्रार

मुंबई : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांच्याशी वाद घालणार्‍या महिलेविरोधात अखेर पोलिस

सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
मार्च 2026 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र; ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन
शेकापूर ग्रामपंचायत अधिकार्‍यावर गुन्हा; प्रत्युत्तरात तक्रारदारावरही केस दाखल
गिरीश महाजन यांना 'गेट आऊट' म्हणणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल | Saamana  (सामना)

मुंबई : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांच्याशी वाद घालणार्‍या महिलेविरोधात अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीने संबंधित महिलेवर मोर्चात व्यत्यय आणणे आणि अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप केला आहे.
महिला आरक्षणाशी संबंधित घडामोडींनंतर शहरात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या पार्श्‍वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांच्या कन्येने वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत संबंधित महिला आपल्या आलिशान कारमधून उतरून मोर्चात घुसली, मोर्चेकर्‍यांशी अयोग्य वर्तन केले आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे. शांतता राखण्याऐवजी त्या महिलेकडून आक्रमक भूमिका घेतली गेली, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराने माध्यमांशी बोलताना सांगितले की, संबंधित महिलेने मोर्चेकर्‍यांशी तसेच पोलिसांशीही उग्र आणि अवमानकारक भाषेत संवाद साधला. त्यामुळे कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली असून पोलिसांनी या घटनेची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS