Homeताज्या बातम्या

ऐतिहासिक रस्ता, चौक, वास्तूस भूषण देशमुखांचे नाव द्यावे : गुगळे  

जामखेड : जामखेडच्या मातीत जन्मलेले इतिहास अभ्यासक, पत्रकार आणि लेखक भूषण गोपाळ देशमुख यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्याने इतिहासाचा चालता-बोलता

सहा महिन्यांपासून दहशत माजविणारा बिबट्या जेरबंदऔटेवाडी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा सुटकेचा निश्वास
जलसंपदा कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाला न्यायालयाची मान्यतागोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळाविरोधातील याचिका फेटाळली
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे


जामखेड : जामखेडच्या मातीत जन्मलेले इतिहास अभ्यासक, पत्रकार आणि लेखक भूषण गोपाळ देशमुख यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्याने इतिहासाचा चालता-बोलता ज्ञानकोश गमावला आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी अहिल्यानगरमधील एखाद्या ऐतिहासिक रस्त्याला, चौकाला किंवा वारसा मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी एच. यू. गुगळे उद्योग समूहाचे रमेश गुगळे यांनी केली आहे.
६ जून रोजी भूषण देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना गुगळे म्हणाले, “भूषण देशमुख हे असामान्य व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. ज्ञान, सखोल अभ्यास, विनम्र स्वभाव आणि कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान मिळविला. नगरच्या प्रत्येक दगडामागचा इतिहास, प्रत्येक वास्तूमागची कथा आणि प्रत्येक वारशामागचा संदर्भ त्यांच्या स्मरणात जिवंत होता.”
इतिहासाचा केवळ अभ्यास न करता त्यांनी तो समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. ‘वारसा पदभ्रमंती’च्या माध्यमातून त्यांनी अनेक पिढ्यांना आपल्या शहराच्या इतिहासाची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून दिली. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे नगरचा इतिहास पुस्तकांच्या पानांपुरता मर्यादित न राहता जनमानसात रुजला, असेही गुगळे यांनी नमूद केले.
इतिहास संवर्धनासाठी त्यांनी केलेले संशोधन, घेतलेली अथक मेहनत आणि दिलेले नि:स्वार्थ योगदान कायम स्मरणात राहील. भूषण देशमुख यांचे निधन म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अंत नसून इतिहासाचा एक अमूल्य दस्तऐवज, संस्कृतीचा सजग रक्षक आणि वारशाचा खरा उपासक हरपल्याची भावना इतिहासप्रेमींमध्ये आहे.
अहिल्यानगरच्या इतिहासासाठी आयुष्य वेचणाऱ्या भूषण देशमुख यांच्या कार्याचा गौरव म्हणून शहरातील एखाद्या ऐतिहासिक स्थळाला त्यांचे नाव देण्यात यावे. इतिहास जपणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला तीच खरी आदरांजली ठरेल. शासन, प्रशासन आणि इतिहासप्रेमींनी या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा रमेश गुगळे यांनी व्यक्त केली.

COMMENTS