Homeताज्या बातम्या

बँक ऑफ बडोदाचा १ TB डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा आरोप; ग्राहकांची महत्त्वाची माहिती धोक्यात? बँकेचा खुलासा

मुंबई: देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेशी संबंधित ए

शिक्षक संघटना एवढ्या निद्रिस्त कशा? डॉ. नंदकुमार उघाडे यांचा संतप्त सवाल; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन
देवळाली प्रवरा येथील दोन उद्योजक शेतकरी पुत्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विशेष गौरव
तामसा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध देशी दारूसह दोन जेरबंद, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त
Bank of Baroda to get more branches - Times of India

मुंबई: देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेशी संबंधित एक मोठी सायबर सुरक्षा घटना समोर आली असून अहवालानुसार, अंदाजे १ टीबी (TB) बँक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा आरोप केला जात आहे. या डेटामध्ये ग्राहकांची महत्त्वपूर्ण वैयक्तिक व बँकिंग माहिती असल्याचा दावा केला जात असल्याने ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अहवालानुसार, कथितरीत्या लीक झालेल्या डेटा सॅम्पल्समध्ये ग्राहकांची नावे, वैयक्तिक माहिती, बचत आणि चालू खात्यांचा डेटा, कर्जाशी संबंधित कागदपत्रे, नेट बँकिंग युझर तपशील, एनआरआय (NRI) व कॉर्पोरेट बँकिंग नोंदी, बँक अर्जांचे नमुने, शाखा व एटीएमच्या नोंदी, ग्राहक सहाय्यता (Customer support) कागदपत्रे, बॉबवर्ल्ड (bobWorld) ऑडिट अहवाल आणि अंतर्गत दक्षता तपासाशी संबंधित संवेदनशील कागदपत्रांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. कथित हॅकरने या डेटाचे काही सॅम्पल्स आणि डाउनलोड लिंक्स शेअर केल्याचा दावा केला जात असून सोशल मीडियावर ग्राहकांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

बँकेचे स्पष्टीकरण; कोअर बँकिंग सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित

दरम्यान, या संपूर्ण घटनेवर बँक ऑफ बडोदा प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. बँकेने म्हटले आहे की, या घटनेची माहिती मिळताच तात्काळ आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली असून प्रकरण पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आले आहे.

बँकेच्या मुख्य ‘कोअर बँकिंग सिस्टीम’मध्ये (Core Banking System) कोणताही अनधिकृत प्रवेश झालेला नाही आणि ग्राहकांची बँकिंग प्रणाली व निधी पूर्णपणे सुरक्षित आहे, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे. बँकेची सिक्यॉरिटी सिस्टीम अत्यंत मजबूत असून या प्रकरणाचा सखोल फॉरेंसिक तपास सुरू करण्यात आला आहे. बँक या संदर्भात संबंधित तपास यंत्रणा आणि सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत असून माहिती सुरक्षेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी व ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS