Homeताज्या बातम्या

बीड मतदारसंघातील नागरिकांनी एसआयआर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी-डॉ.योगेश क्षीरसागरमतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी ‘बीएलओ’ला सहकार्य करण्याचे आवाहन

भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून, मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या घरभेटीने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा शुभारंभअचूक मतदार यादीसाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन
कामाचा ‘ताप’ अन पावसाची धारभर पावसात शिक्षक करतायेत ‘एसआयर’चे काम
शिक्षकांना एसआयआरच्या कामात गुंतवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी?सरकारने भूमिका स्पष्ट करावी; महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांची मागणी



भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून, मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित करण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन तसेच बूथबर थांबून मतदारांच्या माहितीची पडताळणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून एसआयआरचा नमुना अर्ज भरून द्यावा, असे आवाहन भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या या मोहिमेचा उद्देश कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि अपात्र नावे मतदार यादीत राहू नयेत, हा आहे. डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, बीएलओ आपल्या प्रभागात दररोज भेट देत असून नागरिकांनी त्यांना योग्य माहिती व आवश्यक कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून द्यावी. एसआयआरचा फॉर्म वेळेत भरून दिल्यास मतदार यादीतील नाव अचूक राहण्यास मदत होईल. मतदार यादीतील नाव कायम राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून भविष्यात मतदानाच्या हक्कासह विविध शासकीय प्रक्रियांसाठीही त्याचा लाभ होतो. ते पुढे म्हणाले की, अनेक नागरिक मतदान ओळखपत्राचा उपयोग केवळ मतदानापुरताच असल्याचा समज करून घेतात. प्रत्यक्षात विविध शासकीय कामकाज, ओळख पडताळणी तसेच इतर अनेक प्रक्रियांमध्ये मतदार ओळखपत्र उपयुक्त ठरते. त्यामुळे मतदार यादीतील नाव वगळले जाणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. बीएलओ आपल्या घरी आल्यानंतर त्यांना आवश्यक माहिती देऊन एसआयआर प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही गैरसोय किंवा शासकीय कामात अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहनही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

COMMENTS