Homeताज्या बातम्या

कु.संजीवनी कमलाकर राऊत हीस आंतरराष्ट्रीय कोलाज स्पर्धेत पुरस्कारयोगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पगारदार संस्थेकडून कु.संजीवनी राऊत हीचा सत्कार

आंतरराष्ट्रीय कोलाज स्पर्धेत पुरस्कार मिळवून अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल केल्याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पगारदार संस्थेकडून वार्

धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा
अंबाजोगाई येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन सादर
अंबाजोगाईत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नव्या इमारतीचे लोकार्पणआ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते उध्दघाटन



आंतरराष्ट्रीय कोलाज स्पर्धेत पुरस्कार मिळवून अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल केल्याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पगारदार संस्थेकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत कु.संजीवनी कमलाकर राऊत हीचा हार्दिक सत्कार आणि विशेष कौतुक करण्यात आले.
येथील योगेश्वरी माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक डॉ.कमलाकर राऊत यांची कन्या व स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी कु.संजीवनी राऊत हीस रंगोत्सव सेलिब्रेशन या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेणार्या संस्थेच्या वतीने आयोजित कोलाज मेकिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर बी ग्रेड संपादन केल्याबद्दल मेडल, प्रशस्तिपत्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बी डबल प्लस ग्रेड संपादन केल्याबद्दल ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याआधी कु.संजीवनी हीने एम.टी.एस.ऑलिम्पियाड, पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता दुसरीसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात नववा क्रमांक प्राप्त करून स्पेशल गोल्ड मेडल मिळविले आहे, तसेच याच संस्थेने आयोजित केलेल्या इयत्ता पाचवीसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे आणि विविध स्पर्धा परीक्षेत नैपुण्य प्राप्त केले आहे. कु.संजीवनी हीने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या वतीने आयोजित राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत विशेष योग्यता आणि इयत्ता पहिलीपासून प्रतिवर्षी विशेष प्राविण्य संपादन केले आहे. सदरील दैदीप्यमान पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापिका स्वरूपा डिग्रसकर, उपमुख्याध्यापिका दीपाली जाधव, चित्रकला शिक्षिका अंजली हाके, शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पगारदार संस्थेच्या वतीने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सचिव राजकुमार साळवी यांच्या हस्ते गुणवंत सभासद पाल्य म्हणून कु.संजीवनी हीचा सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन सत्कार आणि कौतुक करण्यात आले. अभ्यासा सोबतच चित्रकलेसाठी आपल्या गुरूजनांचे, आई वडिलांचे प्रोत्साहन लाभल्याचे, कु.संजीवनी हीने आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पगारदार संस्थेचे अध्यक्ष बी.के.मसने, उपाध्यक्ष रवींद्र कदम, कोषाध्यक्ष शिवहार ढगे, संचालक, तसेच सभेसाठी उपस्थित शिक्षक, प्राध्यापक आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS