विवाहितेचा छळ करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्या

विवाहितेचा छळ करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : माहेरून आईकडून पैसे व सोन्याची अंगठी आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तिचा पती व सासु-सासर्‍यांवि

जिद्दीच्या जोरावर न्यायासनापर्यंत झेप !
आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश कोपरगावला उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाची मंजुरी
लोणी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित; २० चौकांत ८८ तर कोल्हारमध्ये ३३ कॅमेरे

अहमदनगर/प्रतिनिधी : माहेरून आईकडून पैसे व सोन्याची अंगठी आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तिचा पती व सासु-सासर्‍यांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अक्षय रामदास गुंजाळ, सासरे रामदास दुर्गा गुंजाळ, सासु सुनीता रामदास गुंजाळ (रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 2 जून 2016 रोजी विवाह झालेला असून दोन मुले व एक मुलगी आहे. त्यानंतर दोन- तीन वर्ष व्यवस्थित नांदविले. भावाने पतीला उत्पन्नाचे साधन म्हणून एक रिक्षा घेऊन दिली होती. मात्र, त्यानंतर आईकडून पैसे व एक तोळयाची सोन्याची अंगठी आणून दे, असे ते कायम म्हणत होते. सासरच्या लोकांनी किरकोळ घरगुती कारणातून त्रास देण्यास सुरुवात केली. भरोसा सेल येथे पती व सासरच्या लोकांविरूध्द तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु ते तारखेला हजर न राहिल्याने समझोता झाला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS