भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा

Homeताज्या बातम्या

भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा

उल्हासनगरच्या खेमानी परिसरातील घटना

उल्हासनगर प्रतिनिधी  - उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत पाहायला मिळतेय. दरम्यान, आता तर दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरट्याने

कोकण किनारपट्टीला ३.८ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा
वाचनसंस्कृती वाढवली तरच, नीती आणि नाती टिकतील ः देशमुख
रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत पण… | LOKNews24

उल्हासनगर प्रतिनिधी  – उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत पाहायला मिळतेय. दरम्यान, आता तर दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरट्याने हात साफ केलाय. रस्त्यावर कुणीच नाही, याचा गैरफायदा घेत या सोनसाखळी चोराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळ काढला. अवघ्या सहा सेकंदात ही चोरी करण्यात आली. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही थरारक घटना उल्हासनगरच्या खेमानी परिसरातील आहे. याप्रकरणी मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

COMMENTS