नगरला धोका ठरणारा पाझर तलाव होणार दुरुस्त ; हिवरे बाजारच्या प्रस्तावास मान्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरला धोका ठरणारा पाझर तलाव होणार दुरुस्त ; हिवरे बाजारच्या प्रस्तावास मान्यता

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारमधील सुमारे 50 वर्षांपूर्वीचा पाझर तलाव फुटल्यास पुराचा धोका अहमदनगर शहरापर्यंत येऊ

पशुहत्येस विरोध केल्याने मढी देवस्थानच्या कर्मचार्‍यांना मारहाण
संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
आई जगाचा पोशिंदा तर शेतकरी बाप व दिशा देणारा शिक्षक ः सुनील कडलग

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारमधील सुमारे 50 वर्षांपूर्वीचा पाझर तलाव फुटल्यास पुराचा धोका अहमदनगर शहरापर्यंत येऊ शकेल, अशा तहसीलदारांच्या अहवालावर शासनाने तातड़ीने दखल घेतली असून, संबंधित तलाव तातडीने दुरुस्त करण्यास मान्यता दिली आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिलेल्या आदेशानुसार लवकरच या कामासाठी शासकीय निधी मिळणार असून, लोकसहभाग या तलावाची दुरुस्ती केली जाणार आहे.
आदर्श गाव हिवरे बाजार येथील धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस मान्यता मिळाल्याची माहिती देताना पुण्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले की, आदर्श गाव हिवरे बाजार (ता.नगर) येथील पाझर तलाव क्र.1 हा सन 1972 साली झाला आहे. मागील 50 वर्षात 3 ते 4 वेळा वारंवार दुरुस्ती करूनही या तलावाची गळती थांबत नाही. या तलावाची पाणी साठवण क्षमता 0.13 द.ल.घ.मि. आहे.सन 2019-20 च्या अतिवृष्टीत हा पाझर पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आणि तलावास सांडवा नसल्यामुळे तलाव कधी फुटेल हे सांगता येत नव्हते. तसेच त्यानंतर त्याची पाहणी केल्यावर नगरच्या तहसीलदारांनी हा पाझर तलाव फुटल्यास पुराचा धोका अहमदनगर शहरापर्यंत होईल, असा अहवाल सादर करून हा तलाव धोकादायक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते, असे पवार म्हणाले. मध्यंतरी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी हिवरे बाजारला भेट दिली असता त्यांना पद्मश्री पवार यांनी संबंधित तलाव दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गडाख यांनी संबंधित विभागास या पाझर तलाव दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्यास सांगितले आणि संबंधित विभागामार्फत सर्वेक्षण करून सविस्तर अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. आणि त्यानुसार नुकतीच गडाख यांच्या प्रयत्नातून या पाझर तलाव क्र.1च्या दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच शासकीय निधी आणि लोकसहभाग यातून उत्कृष्ट दर्जाचे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात येणार आहे. या पाझर तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर हिवरे बाजार येथील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पर्यायाने भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल, तसेच तलाव फुटून नगर शहराला होणारा पुराचा धोकाही टळेल, असा विश्‍वास पद्मश्री पवार यांनी व्यक्त केला.

COMMENTS