‘नो किंग्स’ म्हणत ट्रम्प विरोधात कोट्यवधी नागरिक रस्त्यावर !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘नो किंग्स’ म्हणत ट्रम्प विरोधात कोट्यवधी नागरिक रस्त्यावर !

   अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या “नो किंग्स” या व्यापक आंदोलनाने केवळ एक राजकीय घटना म्हणून नव्हे, तर लोकशाह

युद्ध नको, शांतता हवी !
युद्ध संपू शकते पण.. जखमांचे काय ?
फ्रान्सवर 200 टक्के आयातकर लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1-1.png

   अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या “नो किंग्स” या व्यापक आंदोलनाने केवळ एक राजकीय घटना म्हणून नव्हे, तर लोकशाहीतील संघर्षाच्या नव्या पर्वाची नांदी म्हणून लक्ष वेधले आहे. लाखो लोकांचा सहभाग, ३,००० हून अधिक रॅली, आणि जागतिक पातळीवर उमटलेले प्रतिध्वनी या सर्व गोष्टींमुळे या आंदोलनाचे स्वरूप ऐतिहासिक ठरत आहे. 

या पार्श्वभूमीवर, व्हिएतनाम युद्धकाळातील आंदोलनांची आठवण होणे साहजिक आहे. त्या काळातही अमेरिकन नागरिकांनी आपल्या सरकारच्या धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला होता. आजचा क्षण हा इतिहासाच्या आरशात पाहण्याचा आहे.

मार्च २०२६ मध्ये उभ्या राहिलेल्या या आंदोलनाने अमेरिकेतील सर्व ५० राज्ये व्यापली असून, अनेक देशांमध्येही त्याचे पडसाद उमटले. या रॅलीमागील प्रमुख मुद्दे असे दिसतात, इराणविरोधातील लष्करी कारवाईबाबत असंतोष, स्थलांतरविषयक कठोर धोरणे, वाढती महागाई आणि आर्थिक अस्थिरता, लोकशाही संस्थांवर होणारा आणला जाणारा दबाव. परवाच अमेरिकेतील जाॅन एफ केनेडी या सांस्कृतिक सभागृहाबाहेर अमेरिकेतील लेखक, विचारवंत, संगीतकार आणि विविध क्षेत्रातील कलाकार यांनी ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. अनेक चित्रपट कर्मी आणि पूर्वीचे माध्यमकर्मी यांनी देखील सहभाग घेऊन ट्रम्ट यांना थेट हुकुमशहा म्हटले. तर, कालच्या रॅलीत अनेक निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वशैलीवर “राजेशाहीसारखी” राजवट अशी टीका केली. “नो किंग्स” हे घोषवाक्य याच भावनेतून उदयास आले आहे. मिनेसोटा, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया अशा राज्यांमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले, तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आणि भाषणांद्वारे आंदोलन अधिक व्यापक बनले. 

 या रॅलीने १९६०-७० च्या दशकात अमेरिकेत व्हिएतनाम युद्ध चालू असताना, राष्ट्राध्यक्षांच्या युद्धनीतीविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती, त्याची आठवण करून दिली. 

१९७२ ते १९७५ च्या काळातील त्या युध्दात मोठ्या प्रमाणात अमेरिकन सैनिक ठार झाले होते. त्यामुळे, अमेरिकन जनतेने तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेविरोधात ते आंदोलन केले होते. या दोन्ही आंदोलनात युद्धविरोधी भावना, विद्यार्थ्यांचा आणि बुद्धिजीवी वर्गाचा मोठा सहभाग, नैतिकता आणि मानवी हक्कांचा मुद्दा आणि माध्यमांद्वारे युद्धातील भीषण वास्तव समोर येणे हे समान धागे आहेत.

त्या काळात “प्रेम करा, युध्द नको” सारखी घोषवाक्ये लोकप्रिय झाली आणि अखेरीस या आंदोलनांनी अमेरिकन धोरणावर प्रभाव टाकला.

व्हिएतनाम युद्धकाळात जसे युद्धविरोधी आंदोलन झाले, तसेच आज इराणविषयक धोरणांवरून असंतोष व्यक्त होत आहे. 

दोन्ही काळात नागरिकांनी सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. तेव्हा, गुप्त लष्करी निर्णय आणि आता कार्यकारी अधिकारांचा अतिरेक झाल्याची नागरिकांची भावना आहे. व्हिएतनाम काळात विद्यार्थी आणि डाव्या विचारसरणीचे गट आघाडीवर होते; काआआल मात्र कामगार संघटना, नागरी हक्क संघटना, आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. तेव्हा वृत्तपत्रे आणि दूरदर्शन आणि आज सोशल मीडिया, जागतिक नेटवर्क यामुळे ककालचे आंदोलन अधिक वेगाने आणि व्यापक प्रमाणावर पसरले.

पण, यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे तो असा की, व्हिएतनाम युद्ध हे थेट दीर्घकालीन युद्ध होते, ज्यात हजारो अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडत होते. त्यामुळे जनतेचा भावनिक उद्रेक तीव्र होता. कालचे आंदोलन मात्र बहुआयामी आहे. ते केवळ युद्धविरोधी नसून, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेविरोधातील असंतोष या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे.

या आंदोलनांकडे दोन भिन्न दृष्टिकोनातून पाहता येते:

लाखो नागरिक शांततेत रस्त्यावर उतरतात, हे लोकशाहीचे सामर्थ्य दर्शवते. तर, त्याच वेळी, हे आंदोलन अमेरिकन समाजातील खोल दरीही उघड करते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील आजच्या रॅली या केवळ तात्कालिक राजकीय प्रतिक्रिया नाहीत. त्या अमेरिकेतील लोकशाही, सत्तेची मर्यादा आणि नागरिकांच्या अधिकारांविषयी चाललेल्या व्यापक संघर्षाचे प्रतीक आहेत. व्हिएतनाम युद्ध काळातील आंदोलनांनी जसा इतिहास बदलला, तसाच परिणाम या आंदोलनांचा होईल का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, जेव्हा नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतात, तेव्हा तो केवळ विरोध नसतो, तर, तो लोकशाहीच्या सामुदायिक आवाज असतो.

COMMENTS