सोनिया गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस आक्रमक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंगळवारी दुसर्‍यांदा ईडी चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी सोनिया गांधी

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक होणार ?
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय?
सोनिया गांधी यांना मातृशोक,

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंगळवारी दुसर्‍यांदा ईडी चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सरकारविरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्यापाठोपाठ सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबणीवर गेली होती. पाच दिवसांपूर्वीच म्हणजे 21 जुलैला ईडीकडून सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी कऱण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची ईडीकडून दुसर्‍यांदा चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाईच्या विरोधात काँग्रेसकडून पुन्हा एकदा देशभर निर्देशने करण्यात येत आहे. ईडीने सोनिया गांधींना सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, चौकशी एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली होती. 21 जुलै रोजी सोनिया गांधींची दोन तासापेक्षा जास्त चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान ईडीने जवळपास 28 प्रश्‍न विचारल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये ईडीकडून राहुल गांधींची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी राजे असून, देशात पोलिसांचे राज्य : राहुल गांधी
काँगे्रसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून दुसर्‍यांदा चौकशी करण्यात येत असल्यामुळे देशभर काँगे्रसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना घेरले होेते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेले. पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचे राज्य आहे अशी टीका केली. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याविरोधात तसेच महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी आंदोलन करत होते. जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण आहे प्रकरण?
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ वृत्तपत्र इ.स. 2008 साली बंद पडले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश साम्राज्यशहांना विरोध करण्यासाठी 1938 मध्ये सुरू केलेले हे काँग्रेसचे मुखपत्र होते. हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर ‘यंग इंडिया’ कंपनीने 2010 साली ते विकत घेतले. यंग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना नोव्हेंबर 2010 साली झाली होती. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सर्वात मोठा म्हणजे 76 टक्के वाटा होता. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 2008 पासून आर्थिक तोटा होत असल्याचं कारण देत बंद करण्यात आलं होतं. काँग्रेसने पुढे जाऊन ‘एजेएल’ला 90 कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले. पक्षाने सांगितले की, हे पैसे वृत्तपत्राला परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात मदत करण्यासाठी होते. तथापि, वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही आणि एजेएल काँग्रेसचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरले. 2010 मध्ये काँग्रेसने ‘एजेएल’कडे 90 कोटींच्या कर्जाची रक्कम परत मागितली. मात्र त्यावेळी कंपनीकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे कंपनीने त्यांच्याकडील मालकी ही गांधींच्या मालकीच्या यंग इंडिया कंपनीकडे सुपूर्द केली. यासाठी यंग इंडियाने ‘एजेएल’ला केवळ 50 लाख रुपये दिले. याचवरुन गांधींनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ताब्यात घेतली आणि या कंपनीच्या मालकीची 2000 कोटींची संपत्तीही आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप केला जातोय.

COMMENTS