Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितासाठी लढा उभा करणाऱ्या संघर्ष योद्धाचा प्रवास थांबला

पाथर्डी प्रतिनिधी- समाजातील उपेक्षित,वंचित, दुर्बल घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी अतुलनीय स्वरूपाच्या सामाजिक चळवळी उभ्या करून महाराष्ट्राच्या समाज

राहुरीमध्ये राज्यपाल व चंद्रकांत पाटील यांच्याप्रतीकात्मक पुतळयांचे दहन पोलिसांनी रोखले
*बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप l पहा LokNews24*
चोरीस गेलेल्या बोअरच्या गाडीचा लागला तामिळनाडूत शोध

पाथर्डी प्रतिनिधी- समाजातील उपेक्षित,वंचित, दुर्बल घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी अतुलनीय स्वरूपाच्या सामाजिक चळवळी उभ्या करून महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणाला वेगळी दिशा देण्याचे कार्य केलेल्या तसेच कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ते पंचायत समिती सभापती,आमदार,राज्यमंत्री,कॅबिनेट मंत्री,विरोधी पक्षनेता,विधानसभा उपसभापती,खासदार,केंद्रीय मंत्री अशा स्वरूपाची यशस्वी राजकीय वाटचाल करणाऱ्या संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाल्याने पाथर्डी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

          गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथे त्यांच्यावर यशस्वी सांध्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्यानंतर २१ दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास बबनराव ढाकणे होऊ लागल्याने त्यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल रुग्णालयात करण्यात आले होते.दरम्यान गुरुवारी पासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव प्रताप ढाकणे यांनी माध्यमाना दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी संघर्ष योद्धा  केदारेश्वर सहकारी कारखाना येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बबनराव ढाकणे यांच्या अभिष्टचिंतनाच्या घेण्यात आलेल्या कार्यक्रमातील बबनराव ढाकणे यांच्या भाषाणाचा व्हिडीओ आणि त्याला माझा अभिमान, माझे गुरु, माझे पिताश्री,संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे साहेब यांचे आज सकाळी साडे दहा वाजता दु:खद निधन झाले आहे असा मजकूर देऊन शेअर करत आपल्या दाटून आलेल्या भावनाना वाट मोकळी करून दिली.त्या व्हिडीओत ढाकणे साहेबांनी म्हटले आहे की,माझ्या जीवनात जसा संघर्ष आला तसाच संघर्ष माझा मुलगा प्रताप याचा वाटेला आला असून त्यांचा तीन वेळेस पराभव झाला तरी तो कंटाळला नाही.सत्ता महत्त्वाची नाही तुमच्या ताकतीच्या जीवावर तो किती वेळा पराभव झाला तरी लढेल.मी राजकीय वाटचाल करत असताना परिवाराकडे लक्ष दिले नाही परंतु आज माझ्या मुलाने चांगले काम करत अनेक अपयश पचवले आहेत म्हणून मी माझ्या मुलांचा सत्कार स्वतः करणार आहे असे म्हणत प्रताप ढाकणे यांचा हार घालत सत्कार केलेला तसेच आपल्याला ताकत ही जनता जनार्दनानी दिली असून सत्ता महत्त्वाची नसून लोकांच्या प्रेमात नाउमेद होताना जिद्दीने काम करत रहा असा सल्ला दिलेला आहे.

अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव शुक्रवार दुपारी एक वाजल्यापासून ते उद्या शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर दुपारी एक वाजेपर्यंत हिंद वस्तीगृह, पाथर्डी येथे ठेवण्यात येणार असून अंत्यविधी शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर दोन वाजता पागोरी पिंपळगाव, ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे करण्यात येणार आहे.

श्री. बबनरावजी ढाकणे यांचा जीवनपट कौटुंबीक पार्श्वभूमी : – बबनरावांचे वडिल दादाबा नारायण ढाकणे यांचे कुटुंब पाथर्डी तालुक्यातील चुंभळी या गावचे. दादाबा ढाकणेंचे वडिल नारायण यशवंत काकणे इ.स. १८९५ मध्ये शेतीच्या निमित्ताने तालुक्यातील अकोले गांवी स्थायिक झाले. वडिल दादाबा व आई ममताबाई दोघेही अक्षर ओळख नसणारे परंतु उपजत व्यवहार चातुर्य त्यांच्या अंगी होते. प्रामुख्याने वंजारी, धनगर, गोसावी, मुस्लिम समाजाची बरती असलेल्या अकोले गांवी दादाबा ढाकणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वकर्तृत्वाने आपले नांव मोठे केले. अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संस्थापक चेअरमन (१९५६), ग्रामपंचायत सदस्य, पाथर्डी तालुका शेतकी माल खरेदी-विक्री संघाचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषविली.बबनरावांना एकूण आठ भावंडे. यात चार बहिणी आणि चार भाऊ. भावांमध्ये बबनराव सर्वात थोरले.

जन्म व बालपण :– बबनरावांचा जन्म बुधवार १० नोव्हेंबर १९३७ रोजी रात्री ९.०० वाजता अकोले गांवी झाला. दोन मुलींच्या पाठीवर पुत्र जन्मास यावा म्हणुन श्रदधाळू आई ममताबाईंनी ग्रामदैवत जानपीर बाबास नवस केलेला होता. नवसाची फेड म्हणुन ग्रामदैवताच्या वार्षिक यात्रेत सोन्याच्या काडीने उजव्या बाजुने बबनरावांचे नाक टोचले गेले. नवसाचे पोर म्हणुन बालपण मजेत गेले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतक-यांच्या कुटुंबातील मुलांप्रमाणे बालपण गेले

शिक्षण :– जिल्हा लोकल बोर्डामार्फत चालविल्या जाणा-या प्राथमिक शाळेत बबनरावांचे चौथीपर्यंतचे शिक्षण अकोले येथे इ.स. १९४३ ते १९४७ या कालखंडात झाले. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे’ या परमपुज्य साने गुरुजींच्या इ.स. १९४२ च्या स्वातं-य संग्रामातील या विचाराने प्रेरित झालेले जेष्ठ स्वातं-य सैनिक माधवराव नि-हाळी यांनी मुलांमध्ये राष्ट्रिय अस्मिता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रिय कर्तव्याची जाणीव होउन आदर्श नागरिक निर्माण होणेसाठी राष्ट्रिय शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता. यातुनच त्यांनी २२ जुन १९४५ रोजी हिंद वसतिगृह ही बोर्डिंग सुरु केलेली होती.

याच वसतिगृहात बबनरावांना पुढिल शिक्षणाच्या सोयी करीता शहरात दाखल करण्यात आले. इ.स. १९४७ ते १९५१ या कालखंडात बबनरावांचे पाचवी ते आठवी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण झाले. ५वी पाथर्डी मुलांची मराठी शाळा. दरम्यान काही काळ पुणे व नगर येथेही त्यांना शिक्षणाकरीता वसतिगृहात रहावे लागले.वसतिगृहात राहुन शहरातील श्री तिलोक जैन शाळेत इ.८वी चे माध्यमिक शिक्षण घेतले.हिंद वसतिगृहातच बबनरावांवर स्वावलंबनाचे राष्ट्रप्रेमाचे, सामाजिक कार्याचे संस्कार झाले. देशाच्या स्वातंय लढ्यातील सेनानी, हैदराबाद मुक्ती संग्रामातील सेनानी यांच्या यसतिगृहात होणा-या बैठकीचा परिणाम बबनरावांवर झालेला दिसून येतो. यातूनच अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची मनोभूमिका तयार झाली.वसतिगृहातील संस्कारातुनच बबनरावांच्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला.यातुनच फेब्रुवारी १९५१ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी दिल्ली येथे जाउन पंडित नेहरूंची भेट घेतली व आपल्यावर झालेल्या अन्यायाचे कथन केले. पंडीत नेहरूंनी आपल्या मंत्री मंडळातील सहकारी मराठी नेते तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख व विज मंत्री काकासाहेब गाडगीळ यांचेकडे पाठवून योग्य ती पूढील कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानुसार काकासाहेब गाडगीळ यांनी पुणे येथे शिक्षणाची व्यवस्था केली.

राजकीय व सामाजिक प्रवास:- १ जानेवारी १९५२ देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव नि-हाळी यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग.ऑक्टोबर १९५२ जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडक यांच्या प्रचारार्थ सक्रिय सहभागी.१४ ऑक्टोबर १९५५ वयाच्या सतराव्या वर्षी गोवा मुक्ती संग्रामात सहभागी, जेष्ठ स्वातं-य सेनानी शिरुभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली दुस-या तुकडीत सहभाग.अहमदनगर जिल्हयातील सर्वात कमी वयाचा व पहिला सत्याग्रही होण्याचा मान सत्याग्रही तुकडीवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात बबनरावांचा हात मोडला.१९५५ ते १९५७ एक तरुण सामाजिक कार्यकर्ता म्हणुन तालुक्यात स्वतंत्र ओळख निर्माण झाली. इ.स. १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यात सक्रिय शिक्षण आठवीनंतर सोडून दिले.

 वैवाहिक व कौटुंबीक जीवन:– २५ मे १९५७ : त्रिभुवनवाडी, ता. पाथर्डी येथील सामान्य शेतकरी उत्तमराव कारखेले यांची कन्या सुमनताईंशी विवाहबदध.१९६९ या कालखंडात पावडीत किराणा दुकान, बहाये होटल, मशिनरी स्पेअर पार्ट आडत दुकान, प्रिंटींग प्रेस यासारखे व्यवसाय केले. १५ ऑगस्ट १९६५ : साप्ताहिक ‘गणराज्य’ या वृत्तपत्राची सुरुवात केली. यातुन पाथर्डी तालुक्याच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी निर्भिडपणाने गणराज्याचा वापर शस्त्रासारखा केला.यातुन बबनरावांना अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत गणराज्य चालवित असतांना दिनांक १५ ऑगस्ट १९६९ रोजी बबनरावांनी ज्ञानेश्वर मुद्रणालय चालू केले.बबनराव व सुमनताई या दाम्पत्यास तीन अपत्ये. कै. राजकुमार, कै. शोभाताई व अॅड. श्री. प्रताप हे होत.

राजकीय वाटचाल :– ८ एप्रिल १९५९ शिक्षणाचा प्रसार खेडोपाडी होउन त्याचा लाभ सर्वांना मिळावा या उददेशाने महाराष्ट्र सरकारने ‘मोफत सक्रिय शिक्षण’ योजनेनुसार प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या ‘व्हिलेज बेंच कमिटी’ अकोले यावर अध्यक्ष म्हणुन निवड, त्याव्दारे शिक्षण जागृती, शालाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात आणणे आदि स्वरुपाची कामे. १९६० वडिलांनी स्थापन केलेल्या अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.०४ जुन १९६२: प्रथमच स्थापन झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी अपक्ष म्हणुन निवडणुक लढविली. जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन लक्ष्मण हेमराज पालवे यांचेकडुन १५९ मतांनी पराभूत,

१९६२ पाथर्डी तालुका सहकाही सुपरवायमिंग युनियनचे प्रेसिडेंट निवडणूकीमध्ये विजय (आजचा तालुका देखरेख संघ) पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमिटी) संचालक पदाचे निवडणूकीत विजय.पाथर्डी तालुका शेतकी माल खरेदी-विक्री सहकारी संघ संचालक पदी निवड.वि. स.पाने योजना सदस्य,जमिन वाटप समिती सदस्य नियुक्ती.

१९६६-६७ विधानसभा आणि लोकसभा पंचवार्षिक  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचे अनंतराव पाटील आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भारदे यांच्या

प्रचारात अनेक युवकांसह सक्रीय सहभाग ०१ जुन १९६७: अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळी मानूर गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने एकमेव उमेदवार म्हणून विजयी, जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदा निवड २० नोव्हेंबर १९६७ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य म्हणून निवड.१९ जानेवारी १९६९ काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी दडपशाहीस कंटाळून पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग.१९७० मध्ये इंदिरा गांधीनी संसद विराजीत केल्याने झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत अहमदनगर जिल्हयात कॉग्रेस विरोधी राजकीय भूमिका१९७२ महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन ग.रा. म्हस्के (बंडखोर कॉंग्रेस) यांच्या विजयात सिंहाचा वाटा. ०२ जुन १९७२अहमदनगर जिल्हा परिषदेच्या टाकळीमानूर गठातुन स्थानिक जनता आघाडीचे उमेदवार म्हणुन विजयी. दुस-यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवड.६ ऑगस्ट १९७२ पाथर्डी तालुका पंचायत समिती सभापती म्हणून निवड.१० जानेवारी १९७७  अहमदनगर जिल्हा जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड. १० फेब्रुवारी १९७७ अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मोहनराव गाडे यांच्या प्रचारात प्रचार प्रमुख म्हणून सक्रिय.२५ फेब्रुवारी १९७८ : १९७७ मध्ये अपेक्षित असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १९७८ मध्ये झाल्या.या निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन ३७१३४ मते प्राप्त होउन विजयी झाले.आमदार म्हणून पहिल्यांदा निवड.०२ ऑगस्ट १९७८ पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणुन निवड ०२१ डिसेंबर १९७९ पुलोद मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणुन निवड,

७ मार्च १९७९ महाराष्ट्र जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवडणुकीव्दारे बहुमताने निवड १ जून १९८० रोजी महाराष्ट्रातील पुलोद सरकार झाले जून १९८० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन जनता पक्षाचा उमेदवार म्हणुन विजयी दुस-यांदा आमदार ० आमदार निवास सुधारणा व व्यवस्थापन समिती अध्यक्ष ८ जून १९८० पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी पक्ष विरहित तालुका विकास मंडळाची स्थापना ०१ जुलै १९८०  महाराष्ट्र विधिमंडळ जनता पक्षाचे गटनेते म्हणुन निवड,१७ डिसेंबर १९८१ महाराष्ट्र विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड. २४ डिसेंबर १९८४ : ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी श्रीमती इंदिरा गांधीची हत्या झालेल्या पार्श्वभूमीवर डिसेंबर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर-दक्षिण मतदार संघातून पराभूत,०६ मार्च १९८५ : महाराष्ट्र विधानसभेवर पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन सलग तिस-यांदा विजयी.२७ नोव्हेंबर १९८७  महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमधून पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती (सिनेटवर) निवडणूकीमधून निवड.३० जुलै १९८८ : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणुन निवड. २७ नोव्हेंबर १९८९  राम मंदिर आणि बोफोर्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या झालेल्या नवव्या सार्वत्रीक निवडणूकीत बीड जिल्हा लोकसभा मतदार संघातुन जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणुन निवड. भारतातील पहिले बंजारी समाजाचे खासदार होण्याचा मान.डिसेंबर १९८९ लोकसभा सदस्य अनुपस्थिती समिती या वैधानिक समितीचे अध्यक्ष म्हणून निवड, २१ नोव्हेंबर १९९०  मंडल आयोग राम मंदिराच्या प्रश्नावर कोसळलेल्या केंद्रातील व्हि.पी. सिंग सरकार नंतर चंद्रशेखर यांनी सरकार स्थापन केले.

चंद्रशेखर मंत्री राज्यमंत्री म्हणून शपथविधी.उर्जाराज्यमंत्री पदाचा कार्यभार भारतातील पहिले बंजारी समाजाचे केंद्रीय मंत्री होण्या मान  १९९१ काँग्रेसने पाठिंबा काढल्याने चंद्रशेखर यांचे सरकार कोसळले.१३ मार्च १९९१ नववी लोकसभा विसर्जीत १२ फेब्रुवारी १९९४ तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांचे उपस्थितीत पाथर्डी येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश ०८ जुलै १९९४ महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड.१६ सप्टेंबर १९९४ शरद पवार मंत्रीमंडळात महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री म्हणुन निवड, पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा कार्यभार,१९९५- १९९३ वा मुंबई नागपुर येथे विधीमंडळावर गोवारी समाजाचा मोर्चा व पक्षासोबत विविध पक्षांसोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, पाथडी विधानसभा मतदार संघातुन आप्पासाहेब राजळे (काँग्रेस) यांच्या विजयात सिंहाचा वाटा १९९९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रीत झाल्या. काँग्रेस पक्षाचा त्याग करून शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन पाथर्डी विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणूकीत पराभूत.०८ एप्रिल २००१ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा. राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेकडेस सपुर्द.३१ ऑक्टोबर २००१ शेतक-यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ‘शेतकरी विचार दल’ या राजकीय पक्षाची क्रांतीवीर नागनाथ आण्णा नाईकवाडी यांचे उपस्थितीत स्थापना २००२  महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी विचार दल पक्षास अहमदनगर जिल्हयात जिल्हा परिषदेच्या सात तर विविध पंचायत समिती गणात दहा ठिकाणी विजय मिळाला.२००४ पक्षीय राजकारणापासुन आजतागायत अलिप्त.

 सामाजिक कार्य :–  ८ जुलै १९६८ : पाथर्डी तालुक्याच्या रस्ते, वीज, जलसींचन प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यविधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावली व सभागृहात उडी घेण्याचा प्रयत्न. सरकारच्या निषेधाच्या घोषणा.

०९ जुलै १९६८ : विधानसभा सभागृहात पत्रके भिरकावली प्रकरणी विशेष हक्कभंग समितीने ७ दिवसाच्या कैदेची शिक्षेची शिफारस केली. यावर विधानसभा सभागृहात तब्बल तीन तास वादळी चर्चा झाली. अखेर सात दिवसाच्या कैदेच्या शिक्षेवर विधानसभा सभागृहाचे शिक्का मोर्तब. ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी.१५ जुलै १९६८  मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातुन सुटका. ० १६ जुलै १९६८  पाथर्डी शहरात अभूतपूर्व सत्कार व मिरवणूक १९६९ ते १९८७ मुळा धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष (वांबोरी चारी आंदोलन) १९६२ रोज पाणी दुष्काळी भागास निदान एका पिकाकरीता का होईना धारी वा बंद पाईपलाईनव्दारे मिळाल अठरा वर्षे सभा मोर्चे, परिषदा, सत्या रस्ता रोको, जेलभरो आदि लोकशाही मार्गाने संघर्ष केला यासाठी केलेला पाठपुरावा

एप्रिल १९६९ मध्ये पहिली मुला परिषद गिरी येथे राज्याचे कृषी व मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे उपस्थितीत भेट घेतली.११ नोव्हेंबर १९७२ पाटबंधारे मंत्री वसंतदादा पाटील यांची मुंबईल शिष्टमंडळासह भेट,२२ डिसेंबर १९७२ अहमदनगर जिल्हा परिषदेत याबाबत ठराव अनुमोदक बबनराव ढाकणे.

२३ फेब्रुवारी १९७३ मुंबईत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची शिष्टमंडळासह भेट.२४ सप्टेंबर १९७४ दुसरी पाटपाणी परिषद मिरी येथे कॉ. दत्ता देशमुख यांच्या उपस्थितीत घेतली. २६ ऑगस्ट १९७७ रोजी शेवगांव, नेवासा, पाथर्डी, नगर तालुक्याती ल प्रमुख नेत्यांसह याबाबत आंदोलनाची रुपरेषा तयार केली. • ७ ऑक्टोबर १९७७ : घोडेगांव ता. नेवासा येथे दहा हजार शेतक-यांसह पाट फोडून आंदोलन केले. शेतक-यांसह तुरूंगात रवानगी.जिल्हयातील तुरुंग अपुरे, सात दिवस तुरुंगवासाची शिक्षा.०७ ऑक्टोबर १९७७ : पासुन नगर, पाथर्डी, नेवासा, शेवगांव तालुक्यात आंदोलनास सुरुवात.२६ ऑक्टोबर १९७७ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कृतीसमिती वधकारी बैठकीत आंदोलनास आचार संहितेषी जिल्हा पोलिस प्रमुखांची मागणी. लोक आंदोलनासाठी पोलिस प्रशासनाकडुन प्रथमच आचार संहितेची मागणीने आंदोलनाची तिव्रता लक्षात येते. “२० जानेवारी १९७८ मांडवे येथे शेतकरी परिषद २४ मार्च १९७८ शेतक-यांसह मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची मुंबईत भेट. १९७९ पुलोद सरकारने वांबोरी बारी संदर्भात महसुल मंत्री उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.मुळा धारीव्दारे दुष्काळी भागास देता येईल असा समितीचा अहवाल ७ फेब्रुवारी १९७८ रोजी सरकार समोर सादर,१७ फेब्रुवारी १९८० : पुलोद सरकार बरखास्त झाल्याने अहवाल तरच पडून ११ सप्टेंबर १९८० मुख्यमंत्री बॅ. अंतुलेची भेट घेउन पुलोद काळात रेल अहवालाची कार्यवाही करण्याची विनंती १ मे १९८३  तिसगांव येथे सर्वपक्षीय शेतकरी परिषद घेतली. ऑक्टोबर १९८६  कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा निर्णय.१० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर १९८६ : या काळात ४५ गावचे लोकांनी रस्ता रोको आंदोलन करुन स्वतःस अटक करुन घेतली. २० डिसेंबर १९८६ : अहमदनगर जिल्हा परिषदेने ठराव करुन मुळा धरणाचे पाटपाणी आठमाही पध्दतीने देण्याचा निर्णय जाहिर केला.

२३ डिसेंबर १९८६ तिसगांव येथे दुसरी शेतकरी परिषद आयोजित. २६ डिसेंबर १९८६ वांबोरी चारीस राज्यसरकारची प्रशासकीय मान्यता. २ फेब्रुवारी १९८७ : पासुन पुन्हा जेलभरोची तयारी, २ फेब्रुवारी १९८७ ते २७ मार्च १९८७ : या कालखंडात आंदोलनात ७५ गावातील लोकांनी सहभागी होउन सुमारे १० हजार शेतक-यांनी स्वतः स अटक करुन घेतली. २२ एप्रिल १९८७ : रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास शेतक-यांचा घेरावो. याच दिवशी चारीस तत्वतः मान्यता.मंत्रीमंडळाचा निर्णय घेउन आठमाही पध्दतीचे पाणी वाटप धोरण सरकारने स्विकारले.१८ जून १९८७ मिरी येथे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत्व वांबोरी चारी योजनेचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात.१९६९ ते १९७३ पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थितीतील कार्य :प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करून स्थानिक शासन संस्थांचा उपयोग करुन  बबनरावांनी पाथर्डी तालुक्यात नालाबंडींग, ११५ लहान मोठे पाझर तलाव, गावतळी, बोअरवेलस, सुकडी वाटप, अन्नछत्र, खडी सेंटर, मोहरी तलाव, घाटशिळ पारगांव तलाव, बेलपारा तलाव, चिंचपूर इजदे मध्यम धरण प्रकल्प आदि स्वरुपाची भरीव स्वरुपाची कामे केली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यास दिनांक ७ जानेवारी १९७३ रोजी स्वतः चे अकोले गांवी आणले. भिषण दुष्काळी परिस्थितीत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सरकारच्या वतीने पक्षभेद, राजकारण, विरोधक न पाहता सर्वसामान्य माणुस पाहिला. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या वतीने वसंतरावांचा पुर्णाकृती पुतळा उभारला. दि. २ फेब्रुवारी १९७६ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले व याच कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात दुष्काळी परिस्थितीत उल्लेखनिय काम करणा-या अधिका-यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सुवर्णपदक देउन गौरव केला गेला.

उसतोड कामगारांसाठी केलेले कार्य :– १९६७ पासुन प्रत्यक्ष साखर कारखान्यांवर जाउन उसतोड मजुरांचे प्रश्न सुटावेत म्हणुन प्रयत्न. १९७० मध्ये राज्यातील उसतोड मजुरांचा पहिला संप घडवून आणला.१९७३-७४ मध्ये केलेल्या संपामुळे राज्य शासनास या प्रश्नी शंकरराव पाटील समिती नेमावी लागली.पाटील समितीने ठरवून दिलेल्या दराच्या अंमलबजावणसाठी ५ मे १९७८ पासुन अहमदनगर जिल्हयात पाच दिवसांचा संप. १६ जून १९७८ रोजी राज्य विधानसभेत ‘राज्यातील साखर कारखान्यातील मजुरांना मिळणारी वेठबिगार पध्दतीची वागणूक’ बाबत अशासकीय ठराव मांडला. यावर सभागृहात चर्चा झाली, शासनाने आश्वासन दिल्यानंतरच ठराव मागे घेण्यात आला.१९८५ ते १९९५ दहा वर्षांच्या कालखंडात संघटनेच्या वतीने कामगारांसाठी श्रमांच्या योग्य मोबदल्यासाठी चार करार केले.

२० नोव्हेंबर १९८६ रोजी सुमारे एक लाख शेतकरी, संपकरी उसतोड कामगार मजुर यांचे उपस्थितीत चिंचवण ता. केज जि. बीड येथे मेळावा घेतला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, कामगार मंत्री भगवंतराव गायकवाड, सहकार मंत्री विलासराव देशमुख, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत शासनाने मागण्या मान्य केल्यानंतर संप मिटल्याची घोषणा. उसतोड कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवाद समिती नेमण्याचे यावेळी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले.त्यानुसार शासनाने दादासाहेब रुपवते समिती गठीत केली होती. ११ ऑक्टोबर १९८८ रोजी उसतोड व वाहतुक कामगारांच्या प्रश्नांसाठी शासनाच्या वतीने दादासाहेब रुपवते समिती नेमली गेली.

समाजातील दुर्बल घटकांच्या विकासातील योगदान:- विणकर पाथर्डी शहरात विणकर समाजाची संख्या जास्त आहे. १९६५ ते १९००५ या दशकात शहरात ६०० हातमाग केंद्र होती.विणकरांच्या विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर १९७० रोजी ५०० विणकरांसह तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. नागपुर येथे सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांची भेट घेउन विणकरांच्या समस्या व प्रश्न मांडले.सहकारी सोसायटयांचे सचिव यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी सचिवांसह सत्याग्रह अनेक विणकर मजुरांना राष्ट्रिय बँकांमार्फत कर्ज अनुदाने उपलब्ध करून दिले.

भूमिहीन : इ.स. १९६९ मये महाराष्ट्र शासनाने वहितीसाठी दिलेल्या जमिनी काढुन घेण्याचा निर्णय घेतलेला होता. जिल्हयातील भूमिहिनांना संघटित केले. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हयातील भूमिहीनांना व हरिजनांना मोफत घरकुलांची योजना राबविली.भटक्या विमुक्त जाती साठींचे कार्य : पाथर्डी तालुक्यात अनेक गांवात वैदू, तिरमली, बंजारा समाजबांधवांची संख्या जास्त आहे. त्यां च्या वाडी, वस्ती, तांडयाच्या विकासासाठी रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आदि मुलभूत गरजांसाठी स्थानिक शासन संस्था, राज्य शासनाच्या वतीने तलाव, कुपनलिका, बंधारे, रस्ते, शाळा, समाज मंदिरांची उभारणी केली. जातीय सलोख्यासाठीचे कार्य : हरिजन वस्तीत सत्यनारायण पुजेचे आयोजन – १९६९ पासुन सुरुवात मुस्लिम बांधवांच्या पुढाकाराने सामुदायिक सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रमाची संकल्पना राबविली. हजारो हिंदु-मुस्लिम या निमित्ताने एकत्रीत.

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठीचे कार्य- संघटना स्थापन केली. बँकांच्या वतीने व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न. तरुणांमध्ये विधायक कार्यास साथ देण्याची वृत्ती निर्माण होणेसाठी २ ऑक्टोबर १९६७ रोजी एकलव्य संघाची स्थापना केली. डी.एड. झालेल्या तरुणांची राज्यव्यापी पहिली परिषद १४ जुलै १९७७ रोजी घेतली. सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्यांसाठी १ ते ३ ऑगस्ट १९७७ रोजी पाथर्डी ते नगर ५२ किलोमीटरची आंदोलन केले. याप्रकरणी ५०० युवकांसह विसापूर जेलमध्ये दिवस तुरुंगवासाची शिक्षा. अखेर शासनाकडून बिनशर्त मुक्तता पावडी मतदार संघाचा विकास पावडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून मतदार संघात स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत जनहिताची मरीब स्वरुपाची कामे केलेली आहेत. उपजिल्हा दर्जाचे सरकारी रुग्णालय. संपुर्ण तालुक्यात कुटुंब कल्याण केंद्रे, श्री क्षेत्र भगवान गड पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा योजना. मोहरी तलाव, जायकवाडी प्रादेशिक पाणी पुरवठा तळ योजना, ताजनापुर उपसा जलसिंचन योजना तालुक्यात सर्वत्र पुल व पक्के रस्ते. एस.टी. डेपो. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, अनेक बीड लोकसभा मतदार संघासाठी विकास कामांचा केलेला पाठपुरावा : • राष्ट्रिय महामार्ग, रेडियो स्टेशन. शहरातील पाणी पुरवठा योजना नगर-बीड-परळी ब्रॉडगेज रेल्वेलाईन, थर्मल पॉवर विस्तारीकरण. मराठवाड्यासाठी बॉम्बे हाय गॅस चा पाईपलाईनव्दारा पुरवठा

राज्य विधिमंडळातील कार्य– सरकारी इमारती,महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य म्हणून २० वर्षे काम केले. विधिमंडळ कामकाजात भाग घेउन विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिने पुढील प्रयत्न केलेले आहेत.महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न,उसतोड वाहतुक कामगारांचे प्रश्न,गिरणी कामगारांचे पुर्नवसन महाराष्ट्रातील शिक्षण,वाली महागाई रोजगार हमी योजना,विविध खात्यातील भ्रष्टाचार. प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन,विधिमंडळ कामकाज.राज्यातील कुटुंब कल्याण योजना.२००४  अकोले या जन्मगावी दादा पाटील माध्यमिक विद्यालयाची स्थापना व उभारणी  २००४: ग्रामीण भागातील विदयाथ्र्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उददेशाने पाथर्डी येथे एम. एम. नि-हाळी उच्च माध्यमिक कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची स्थापना.

सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान- विकास होण्यासाठी अनेक व्यक्तीच्या अंगी असलेल्या विविध गुणांचा स्वयंसेवी सेवाभावी संस्थांची उभारणी केली.ममता प्रतिष्ठाण, वनमित्र सेवा मंडळ, कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान या सारख्या स्वयंसेवी सेवाभावी संस्थांची स्थापना करुन वृदधाश्रम, उसतोड कामगारांच्या पाल्यांकरीता वसतिगृह यासारख्या संस्थांची उभारणी.राज्यपातळीवरील सायकलिंग स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, लेझीम स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदिंचे आयोजनात युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त, सुसज्ज असे संस्कार भवनची निर्मिती केली. तर तरुणांमध्ये शरिर सौष्ठवाची आवड निर्माण व्हावी व बलवान व निर्व्यसनी युवक तयार व्हावेत यासाठी पाथर्डी शहरात अद्यायावत साधन सामुग्रींनी सुसज्ज अशी तिन मजली एकलव्य व्यायाम शाळेची उभारणी.

COMMENTS