Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैद्य रेती उत्खना बाबत शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांचे खडकपूर्णा धरणामध्ये 2 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण

देऊळगावराजा प्रतिनिधी:- देऊळगाव राजा तालुक्यातील अवैद्य रेती उत्खन बाबत बेजबाबदार तहसीलदार श्री धनमाने यांच्या निष्क्रियपणामुळे उत्खनन करणाऱ्या

पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडर तीन हजार पार
शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा
अभियांत्रिकी विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

देऊळगावराजा प्रतिनिधी:- देऊळगाव राजा तालुक्यातील अवैद्य रेती उत्खन बाबत बेजबाबदार तहसीलदार श्री धनमाने यांच्या निष्क्रियपणामुळे उत्खनन करणाऱ्या ओव्हरलोड रेतीच्या टिप्पर मुळे निष्पाप लोकांचे जीव गेले बऱ्याच जणांना अपंगत्व आले शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर मनुष्य वधाच्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करून विभागीय आयुक्त यांनी नेमलेल्या चौकशीच्या अहवालानुसार विभागीय आयुक्त यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर दिलेल्या कारवाईच्या आदेशानुसार संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महिना उलटून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे तसेच आज रोजी सुद्धा खडकपूर्णा धरणातून तसेच नदीपात्रातून राजे रोसपणे बोटीद्वारे जेसीबी टिप्पर द्वारे अवैद्य रेती उत्खनन सुरू असल्यामुळे नदीकाठील गाव अंतर्गत रस्ते खराब झाले आहे.

तसेच बाजार पेठेकडे जाणारे रस्ते पूर्ण पणे खराब झाले आहे त्यामुळे खडक पूर्णा नदीच्या परिसरातील सगळ्याच गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक मानसिक नुकसान झाले आहे याबाबत परिसरातील सरपंच ग्रामस्थांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहे तरीसुद्धा आर्थिक लालसे पोटी झोपेचे सोंग घेतलेले तहसीलदार व त्यांचे संबंधित कर्मचारी जागे व्हायला तयार नाही त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी सुद्धा संबंधित विभागाला पुराव्यासह तक्रारी सादर केल्या होत्या विभागीय आयुक्त अमरावती तसेच उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्या कार्यासमोर आमरण उपोषण केले होते त्यानुसार तत्कालीन आयुक्तांनी चौकशी करून दोशीवर तीन तलाठी एक मंडळ अधिकारी यांना निलंबित करून थातुर्मातुर कारवाई झाली होती परंतु तरीसुद्धा अवैद्य रेती उत्खनन सुरूच असल्यामुळे नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे अनिल चित्ते यांनी तक्रार दाखल केली तसेच त्याचा पाठपुरावा सिंदखेड राजा मतदार संघाचे मा.आमदार डॉ. शशिकांत खेडेकर साहेब यांनी सुद्धा केला त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ विभागीय आयुक्त यांना चौकशीचे निर्देश दिले त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी उपायुक्त भाकरे साहेब यांच्या अध्यक्ष खाली चौकशी समिती गठीत केली.

या समितीने दिलेल्या अहवालानुसार तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याबाबत चौकशी अहवालात सिद्ध झाले त्यानुसार बुलढाणा जिल्हाधिकारी यांना विभागीय आयुक्त यांनी अवैद्य रेती उत्खनन करण्यामध्ये दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईचे आदेश पारित केले त्यामध्ये दोषी अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा खनीकरण अधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई साठी प्रस्ताव मागितले तसेच तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर सामूहिक विभागीय चौकशीसाठी कारवाई करण्यासाठी आदेशित केले परंतु एक महिना उलटून सुद्धा विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार कारवाई झाली नाही तसेच अवैध रेती उत्खनन सुरूच असल्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी मेहुना राजा शिवारात खडक पूर्ण धरणात मध्य भागातील पाण्यातील बेटावर 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती दिवशी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन देऊन इशारा दिला आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा उपोषणाबाबत माहिती दिली आहे तसेच डिग्रस बू येथील 

देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस बू येथे रात्रंदिवस अवैध रेती उत्खनन सुरू असून अवैध वाहतूक रात्रंदिवस चालात असल्यामुळेच जानेवारीत पाबळ ते डिग्रस बू पर्यंत तीन किलोमीटर रोड डांबरीकरण करण्यात आले होते हा रोड निस्करुष्ट दर्जाचा बनवतात आलेला होता असे निवेदनात येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यानी देऊळगावराजा उपविभागीय जीप बांधकाम उपविभाग यांना दिले होते परंतू या निवेदनाची कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने डिग्रस बू येथील तीन किलोमीटर डांबरीकरण पूर्णपणे उखडून चिखलमय गटार साम्राज्य निर्माण झालेले आहेत येथील लोकांची फक्त आणी फक्त दोन महिने डांबरीकरण चे सुख भोगून आज रोजी येथील समस्या दुप्पट वाढ झालेली आहेत. तरी ठेकेदार व उपविभागीय याची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असी येथील गावातील लोक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच याची आहे

COMMENTS