Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात परप्रांतीय तरूणाची गोळ्या झाडून हत्या  

पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल

मुलिंनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी-गटशिक्षणाधिकारी सोनवणे
राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
किनवटमधील समाजमंदिराचे बांधकाम संशयाच्या भोवर्‍याततांत्रिक चौकशीसाठी ड. एम. यू. सर्पे यांचा एल्गार

पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. पसार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, खुनामागचे निश्‍चित कारण समजू शकले नाही.
अनिल साहू (वय 35, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. साहू मूळचा बिहारमधील आहे. साहू कारागीर आहे. साहू, त्याची पत्नी आणि कामगार खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरात एका सोसायटीत भाडेतत्वावर सदनिका घेऊन राहत आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्लेखोराने सदनिकेत शिरून साहूवर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साहूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी घटनास्थळी भेट दिली. साहू याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.

COMMENTS