Homeताज्या बातम्या

पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा  

श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एका इसमाविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी गुन

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळा सकाळ सत्रात भरवाव्यातअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सरकारी स्वस्त धान्य दुकानावर मध्यरात्री दरोडाराहुरी खुर्द येथील घटना ; १२ क्विंटल गहू-तांदूळ लंपास
सोनईच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Shrigonda Crime News,सवयीने केला घात! एकदा पकडले जाऊनही पुन्हा लाच मागितली  आणि... - shrigonda police constable sanjay kale arrested for taking bribe -  Maharashtra Times


श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एका इसमाविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे काही काळ पोलीस स्टेशन परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास एक इसम श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्याने आरडाओरड करत धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडे नाव व पत्ता विचारणा केली असता त्याच्या तोंडातून आंबट व उग्र वास येत असल्याचे आढळून आले. संशय आल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत संबंधित इसम मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा अहवाल दिला.
वैद्यकीय अहवालाच्या आधारे श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश काटकर करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

COMMENTS