Homeताज्या बातम्या

रविवारी बीडमध्ये बंजारा ब्रिगेडची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीच आयोजनबीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे-विष्णू राठोड

हैदराबाद गॅझेटीअर नुसार आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाज

उपवर्गीकरणविरोधी लाँग मार्च रोखण्याचा प्रयत्न; रांजणगावात रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्रमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलकांचा ठिय्या
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच



हैदराबाद गॅझेटीअर नुसार आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, तांड्यावरिल शाळा, विद्यार्थ्यांची  शैक्षणिक परिस्थिती,बंजारा समाजाचा राजकारणातील सहभाग अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष राहुल भाऊ राठोड यांच्या सह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये दि. 21 जुन रोजी बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे बंजारा ब्रिगेडच्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,या बैठकीमुळे बंजारा समाजाच्या अनेक प्रश्नांना वाचा फुटणार आहे.
या बैठकीला बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1948 पर्यंत मराठवाडा निझाम स्टेट मध्ये समाविष्ट करण्यात आला होता तसेच सी.पी.बेरार आताचा विदर्भाचा मध्यप्रदेशात समावेश करण्यात आला होता.निझाम स्टेट व सी.पी व बेरार प्रांतातील बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गाच्या सवलती मिळत होत्या.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मराठवाडा व विदर्भ हे दोन्ही प्रदेश महाराष्ट्राला जोडण्यात आल्याने आपोआपच एस.टी.प्रवर्गाच्या सवलती बंद करण्यात आल्या व त्याऐवजी विमुक्त जातीचे आरक्षण लागू करण्यात आले. यामुळे एक भाषा, समान वेशभूषा, आपसातील रोटी बेटी व्यवहार,सण-त्योहार संस्कृती-परंपरा,जातपंचायत, समाजाचे धार्मिक आदर्श एकसमान असताना तसेच बापट आयोग,रेणके आयोग यांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे अशी शिफारस केली आहे,तरीही महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजावर प्रचंड अन्याय केला आहे.   हैदराबादच्या गॅझेटीअरच्या धर्तीवर मराठवाडा सह महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण विनाविलंब देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील बंजारा समाजाने रान पेटवले आहे. सर्वत्र विविध प्रकारचे आंदोलन करुन शासन प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण केला जात आहे. महाराष्ट्रातील चाळीस पेक्षा जास्त आमदार व पाच ते दहा खासदारांनी मुख्यमंत्री आदरनिय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र पाठवून बंजारा समाजाच्या एस.टी.आरक्षण मागणीला पाठिंबा दिला आहे,हि उल्लेखनीय बाब आहे. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी मागील तीस पस्तीस वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करुन राज्य सरकारकडे मागणी केली गेली आहे, परंतु दुर्दैवाने सरकारने समाजाच्या न्यायिक व संविधानीक मागणीला केराची टोपली दाखवली आहे.सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे बंजारा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हा बंजारा ब्रिगेडच्या वतीने आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरवण्यासाठी रविवार दि. 21 जून रोजी या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन बीड येथे करण्यात आले आहे. तरी बीड जिल्ह्यातील बंजारा ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे बंजारा ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विष्णू राठोड यांनी कळवले आहे.

COMMENTS