Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कन्या विद्यालयात माजी विद्यार्थिनींचा मेळावा उत्साहात

श्रीगोंदा : येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय येथे माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेच्या निमित्ताने माहेरी आलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींनी या मेळाव्यास उत्स्फूर्त उपस्थिती लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था या संस्थेच्या बॉडीचे सदस्य कुंडलिकराव दरेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा भोईटे यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थिनींच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या सर्वसाधारण सभेतून विद्यालयाचा माजी विद्यार्थिनी संघ स्थापन करण्यात आला. संघाच्या कार्यकारिणीची निवड विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी जाहीर केली. तसेच विद्यालयातील अनेक माजी शिक्षकांचीही यावेळी उपस्थिती लाभली. मेळाव्यात चर्चासत्र, कार्यकारिणी निवड, अनुभवांची देवाणघेवाण, ‘सेल्फी विथ आयडी कार्ड’, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल प्रमुख किरण शिंदे व सचिन गारुडकर यांनी केले, तर पुष्पा घोडे यांनी आभार मानले.

शिवरायांचे विचार अंगिकारल्यास स्वराज्य उभे राहील : नागवडे
रामदास शिंगाडे यांचा रयत सेवक समितीकडून सन्मान
नागवडे विधी महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यान

श्रीगोंदा : येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय येथे माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेच्या निमित्ताने माहेरी आलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींनी या मेळाव्यास उत्स्फूर्त उपस्थिती लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था या संस्थेच्या बॉडीचे सदस्य कुंडलिकराव दरेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा भोईटे यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थिनींच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

या सर्वसाधारण सभेतून विद्यालयाचा माजी विद्यार्थिनी संघ स्थापन करण्यात आला. संघाच्या कार्यकारिणीची निवड विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी जाहीर केली. तसेच विद्यालयातील अनेक माजी शिक्षकांचीही यावेळी उपस्थिती लाभली. मेळाव्यात चर्चासत्र, कार्यकारिणी निवड, अनुभवांची देवाणघेवाण, ‘सेल्फी विथ आयडी कार्ड’, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल प्रमुख किरण शिंदे व सचिन गारुडकर यांनी केले, तर पुष्पा घोडे यांनी आभार मानले.

COMMENTS