Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुडनशहावली बाबांचा संदल उत्साहात

जंगी कुस्त्यांचा हागामा;पिंपरखेडला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन  जामखेड : शंभर वर्षांपूर्वीपासून परंपरा कायम असलेल्या हिंदू-मुस्लिम  एकतेचे प्रतिक असलेल्या जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील सय्यद बुढनशाहवली बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सालाबादप्रमाणे गावकऱ्यांच्या वतीने यंदाही ऊरूसानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांचा हंमाम भरवला होता. पंचक्रोशीतील तसेच परजिल्ह्य़ातून नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. पिंपरखेडच्या हागाम्यात सामील होत अनेक पैलवानांनी उल्लेखनीय कुस्त्या सादर केल्या. कुस्ती खेळलेल्या सर्व पैलवानांना यथायोग्य बक्षीस दिले गेले.  कुस्त्यांच्या फडाचे नियोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी माजी संचालक करण ढवळे, चेअरमन पांडुरंग ढवळे, व्हा. चेअरमन संभाजी कारंडे, सचिव शहाजी ओमासे, आनंदराव भापकर, शिवाजी कोळेकर, तुकाराम लबडे, अरूण गाडेकर, विशाल गाडेकर, दादाभाई शेख, फैय्याज शेख, धनंजय ढवळे, काशिनाथ झिझाडे, उत्तम ढवळे, श्रावण मस्के आदींनी परिश्रम घेतले. जाती पातीच्या भिंती तोडून मानवता धर्माची शिकवण देणारे अवलिया संत म्हणजे सय्यद बुडनशहावली बाबा होय. माद्य पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून तीन चालणारया या यात्रेमध्ये सर्वजाती धर्माचे लोक एकत्रितपणे फुलांच्या चादरी,मलिदा वगैरे घेऊन येतात व मनोभावे पूजा अर्चा करतात. यात्रेसाठी सर्वच गावाकडे : सरपंच ओमासे पिंपरखेड गावातील सर्व जाती धर्मातील लोक नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त राज्यभर राहतात. मात्र गावाच्या ग्रामदैवत बुढनशाहवली बाबांच्या उरुसाच्या निमित्ताने सर्वजण काही दिवस गावाकडे येतात. राज्यभरातून बाबांचे भक्त येतात. हिंदू मुस्लिम एकता तसेच जातीय सलोख्याचे मोठ्या परंपरेचे उदाहरण असलेले बुढनशाहवली बाबाचा उरूस मोठ्या सौहार्दपूर्ण वातावरणात शांततेत पार पडला. असे सांगत सर्व गावकरी व भाविक भक्तांचे आभार सरपंच राजेंद ओमासे यांनी आभार मानले. गायकवाडांचा ११ वर्षांपासून मोफत चहापाणी उपक्रम   यात्रेत येणाऱ्या- जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सामाजिक जाणीवेतून नंदकुमार गायकवाड यांच्या वतीने तीन दिवस मोफत चहापाणी वाटप करण्यात आले. गेल्या ११ वर्षांपासून नंदकुमार गायकवाड यांच्याकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

शेतकरी लाचार रहावा म्हणून राज्यकर्ते प्रयत्नशील : राजु शेट्टी
प्रशासनाविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले; आज जामखेड बंद 
नान्नजचा अलमेर शेख बनला सनदी लेखापाल

जंगी कुस्त्यांचा हागामा;पिंपरखेडला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन 

जामखेड : शंभर वर्षांपूर्वीपासून परंपरा कायम असलेल्या हिंदू-मुस्लिम  एकतेचे प्रतिक असलेल्या जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील सय्यद बुढनशाहवली बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सालाबादप्रमाणे गावकऱ्यांच्या वतीने यंदाही ऊरूसानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांचा हंमाम भरवला होता. पंचक्रोशीतील तसेच परजिल्ह्य़ातून नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. पिंपरखेडच्या हागाम्यात सामील होत अनेक पैलवानांनी उल्लेखनीय कुस्त्या सादर केल्या. कुस्ती खेळलेल्या सर्व पैलवानांना यथायोग्य बक्षीस दिले गेले.  कुस्त्यांच्या फडाचे नियोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी माजी संचालक करण ढवळे, चेअरमन पांडुरंग ढवळे, व्हा. चेअरमन संभाजी कारंडे, सचिव शहाजी ओमासे, आनंदराव भापकर, शिवाजी कोळेकर, तुकाराम लबडे, अरूण गाडेकर, विशाल गाडेकर, दादाभाई शेख, फैय्याज शेख, धनंजय ढवळे, काशिनाथ झिझाडे, उत्तम ढवळे, श्रावण मस्के आदींनी परिश्रम घेतले.

जाती पातीच्या भिंती तोडून मानवता धर्माची शिकवण देणारे अवलिया संत म्हणजे सय्यद बुडनशहावली बाबा होय. माद्य पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून तीन चालणारया या यात्रेमध्ये सर्वजाती धर्माचे लोक एकत्रितपणे फुलांच्या चादरी,मलिदा वगैरे घेऊन येतात व मनोभावे पूजा अर्चा करतात.

यात्रेसाठी सर्वच गावाकडे : सरपंच ओमासे

पिंपरखेड गावातील सर्व जाती धर्मातील लोक नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त राज्यभर राहतात. मात्र गावाच्या ग्रामदैवत बुढनशाहवली बाबांच्या उरुसाच्या निमित्ताने सर्वजण काही दिवस गावाकडे येतात. राज्यभरातून बाबांचे भक्त येतात. हिंदू मुस्लिम एकता तसेच जातीय सलोख्याचे मोठ्या परंपरेचे उदाहरण असलेले बुढनशाहवली बाबाचा उरूस मोठ्या सौहार्दपूर्ण वातावरणात शांततेत पार पडला. असे सांगत सर्व गावकरी व भाविक भक्तांचे आभार सरपंच राजेंद ओमासे यांनी आभार मानले.

गायकवाडांचा ११ वर्षांपासून मोफत चहापाणी उपक्रम 

 यात्रेत येणाऱ्या- जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सामाजिक जाणीवेतून नंदकुमार गायकवाड यांच्या वतीने तीन दिवस मोफत चहापाणी वाटप करण्यात आले. गेल्या ११ वर्षांपासून नंदकुमार गायकवाड यांच्याकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

COMMENTS