अशोक चव्हाण होणार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक चव्हाण होणार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष ?

नाराजी टाळण्यासाठी देणार नवे पद; काँग्रेस नेते नाना पटोलेंवर नाराज

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील खदखद बाहेर पडतांना दिसून येत असून, अनेक नेत्यांनी पक्षांवर जाहीर टीका केली आहे. अशावेळी महाराष

अशोक चव्हाणांसह 12 आमदार कॉंग्रेसचा ‘हात’ सोडणार ?
जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी
अखेर अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचा झेंंडा

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील खदखद बाहेर पडतांना दिसून येत असून, अनेक नेत्यांनी पक्षांवर जाहीर टीका केली आहे. अशावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र चव्हाण यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पक्षात लवकरच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद दिले असणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे.
काँगे्रसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक असून, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. तसेच त यांची अनेक विधाने पक्षाला अडचणीत ठरणारी होती. त्यामुळे काँगे्रसमधील अनेक नेते नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचे समोर आले आहे. ग्रेसमधील हा गोंधळ निस्तारण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पावले उचलली आहेत. चव्हाणांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्यासमोर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले असले, तरी प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्याची मागणीही या नेत्यांनी केल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना देखील अध्यक्षपदावरून काढण्याची शक्यता आहे. सध्या तरी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे देखील अस्पष्ट आहे.

COMMENTS