Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कौटुंबिक वादातून जन्मदात्याचा क्रूर अंत; चार निष्पाप चिमुरड्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

https://www.youtube.com/watch?v=Oe6HWqpvxD4 बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि सुन्न करणारी घटना स

कर्जत तालुक्यातील शिंदे गावात मारहाणीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, एक ताब्यात
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
शहापूर शिवारात विवाहित महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह 

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचा अंत इतका भयंकर होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. एका जन्मदात्याने आपल्याच चार निष्पाप मुलांना विहिरीत फेकून स्वतःही जीवनयात्रा संपवली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. २७ वर्षीय विजय मुसा किराडीया याचे त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादाला कंटाळून विजयने एक टोकाचे आणि भयानक पाऊल उचलले. त्याने आपली चार निष्पाप मुले—७ वर्षांचा प्रित, ५ वर्षांची प्राची, ३ वर्षांची पूर्वी आणि अवघ्या दीड वर्षाचा चिमुरडा पियुष, या चौघांना जिवंत विहिरीत फेकून दिले.
मुलांना विहिरीत फेकल्यानंतर विजयने स्वतःही त्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. २५ मे रोजी सकाळी जेव्हा ग्रामस्थांना विहिरीमध्ये मृतदेह तरंगताना दिसले, तेव्हा हा संपूर्ण काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला. या घटनेत पाचही जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी जळगाव जामोदच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण राजुरा परिसरात आणि जळगाव जामोद तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक वादातून चार निष्पाप चिमुरड्यांचा जीव गेला आहे, ज्यांचा या वादाशी काहीही संबंध नव्हता. या घटनेने संपूर्ण परिसरातून तीव्र दुःख व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

COMMENTS