वॉशिंग्टन/तेहरान :अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नियोजित मोठा लष्करी

वॉशिंग्टन/तेहरान :अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नियोजित मोठा लष्करी हल्ला रद्द केल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणशी संभाव्य कराराची रूपरेषा तयार होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच इराणने अमेरिकेला हल्ला टाळण्याची विनंती केली होती आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासह अणू कार्यक्रमाबाबत काही अटींवर दोन्ही देशांमध्ये सहमती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, इराणने ट्रम्प यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत हे एक नवे असत्य असल्याचे म्हटले आहे. इराणचे खासदार हसन घासघावी यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इराणकडेच राहील असे स्पष्ट केले. दरम्यान, ओमान किनारपट्टीजवळ होर्मुझच्या प्रवेशद्वाराजवळ एका तेलवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्राने हल्ला झाल्याची माहिती समोर आल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता आणखी वाढली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिका किंवा इस्रायलकडून कोणतीही आक्रमक कारवाई झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे.

COMMENTS