Homeताज्या बातम्या

महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणातून बृजभूषण शरण सिंह निर्दोष

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती

जंतरमंतरपासून मुंबईपर्यंत : विद्यार्थी आंदोलनांची लाट!
अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली पोलिसांवर अतिरिक्त बोजा का? नगरपालिकेने जबाबदारी पार पाडावी; पोलीस हक्क संघर्ष संघटनेची मागणी
डॉ. प्रतीभा थोरात यांची शिंदेसेनेच्या महिला सेना प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती; केज आणि परळीची जबाबदारी
महिला पहलवानों के यौन उत्पीड़न मामले में बृजभूषण शरण सिंह बरी

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दिल्ली कोर्टाचा निकाल आल्यानंतर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘मी योग्य होतो हे सिद्ध झाले आहे’ असे सांगितले. ते म्हणाले की, “माझे वक्तव्य खरे ठरले आहे. मला विरोध करणाऱ्या व्यक्तींबाबत मला काही माहिती नाही. मी म्हणालो होतो की जर मी दोषी असेन तर मला फासावर लटकावा. बाकी आज आनंदाचा दिवस आहे.”

भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप प्रकरण जवळपास साडेतीन वर्षे चालले. त्यानंतर न्यायलयाने आपला निर्णय दिला आहे. या प्रकरणाची सुरुवात जानेवारी २०२३ मध्ये झाली होती.

१८ जानेवारी रोजी जंतर मंतरवर भारताच्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. १९ जानेवारी रोजी बबिता फोगट हिने आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेऊन सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच दिवशी माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील भेट घेतली होती. २० जानेवारी रोजी विनेश फोगट हिने भारतीय ऑलिम्पिक संघ, पंतप्रधान कार्यालय आणि अनुराग ठाकूर यांच्यासह अमित शाह यांच्याकडे ट्विट करून तक्रार केली होती. २१ जानेवारी रोजी अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चेनंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

COMMENTS