Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचं निधन

मुंबई प्रतिनिधी - प्रसिद्ध मॉडेल आणि लॉकअप कंटेस्टंट पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे

Ahmednagar : नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ…भरदिवसा तीन लाखाची बॅग केली लंपास | LOKNews24
खंडणीप्रकरणी कुख्यात बबलू गोलेकरविरुद्ध गुन्हा; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांना जीवे मारण्याची धमकी
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार

मुंबई प्रतिनिधी – प्रसिद्ध मॉडेल आणि लॉकअप कंटेस्टंट पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. इस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनंतर खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये आजची सकाळ आमच्यासाठी खूपच दु:खद ठरली आहे. पुनम पांडेच्या इन्स्टाग्रामवर लिहिण्यात आलं आहे की, आज सकाळी आमच्यासाठी खूप कठीण होती. आम्हाला हे सांगताना दु:ख होत आहे की आमची लाडकी पूनम पांडे हिचं सर्वायकल कॅन्सरने निधन झालं आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांना तिच्याकडून खूप प्रेम मिळालं. या कठीण काळात तिच्या खासगीपणा जपावा अशी आम्ही विनंती करतो. पूनम पांडेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर काही युजर्सना विश्वास बसत नसल्याने त्यांनी तिचं अकाउंट हॅक झालंय का अशी शंका व्यक्त केलीय. दरम्यान, पूनम पांडेच्या मॅनेजरकडून ‘झूम’शी बोलताना तिच्या निधनाचे वृत्त खरे असल्याचं सांगितलं आहे. पूनम पांडे हिने काही चित्रपटांमध्येही काम केलं होतं. नशा, द जर्नी ऑफ कर्मा या चित्रपटात ती दिसली होती. तर लॉकअप या शोमधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अनेकदा तिने सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त कमेंट आणि पोस्टमुळेही ती सातत्याने चर्चेत होती.

COMMENTS