Homeताज्या बातम्यादेश

चालता- चालता तरुणाला आला हार्ट अटॅक

उत्तर प्रदेश- तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यायाम करताना किंवा जेवण करताना हार्ट अटॅक येऊन व्यक्तीचा जीव गेल्याची बातम्य

आठ वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू
स्विमिंग पूलमध्ये पोहताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.

उत्तर प्रदेश- तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यायाम करताना किंवा जेवण करताना हार्ट अटॅक येऊन व्यक्तीचा जीव गेल्याची बातम्या आपण वाचल्या असतील. उत्तर प्रदेशात एक अशीच एक घटना घडलीय. किराणा वस्तू घरी घेऊन जाणाऱ्या एका २२ वर्षीय युवकाला यमाने वाटेतच गाठल्याची घटना घडलीय. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुकानातून किराणा घेऊन जात असताना एका २२ वर्षीय युवकाला हार्ट अटॅक आला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलीय. चालता- चालता हा युवक रस्त्यावर पडला, त्यावेळी त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांना वाटलं की, त्याला कोणत्यातरी वाहनाने धडक दिली असावी. परंतु परंतु डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात ही घटना घडलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत युवकाचे नाव सुमित मौर्य असे आहे. सुमित बाजारात खरेदी करणयासाठी गेला होता. त्यावेळी किराणा घेऊन येत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. ही घटना बाजारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

COMMENTS