Homeताज्या बातम्या

चकलांबा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध वाळू, गुटखा व देशी दारू जप्त, ३१.९८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चकलांबा: बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ जुलै २०२६ रोजी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; ८३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, ६२४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी
पेपरफुटीवर संसद ठप्प!
शासनाच्या योजना शेवटपर्यंत पोहोचवणे हेच पुण्याचे कार्य; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगावमधील मेळाव्यात प्रतिपादन

चकलांबा: बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ जुलै २०२६ रोजी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक, प्रतिबंधित गुटखा वाहतूक आणि अवैध देशी दारू विक्री अशा तीन स्वतंत्र कारवाया करून एकूण ३१,९८,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिल्या कारवाईत गोपनीय माहितीच्या आधारे उमापूर-माटेगाव रस्त्यावर सापळा रचून एमएच-२३ एयू-८५०० क्रमांकाचा हायवा ताब्यात घेण्यात आला. वाहनात सुमारे ५ ब्रास अवैध वाळू आढळून आली. या कारवाईत हायवा व वाळूसह ३०,३०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक शेख रहीम शेख राजू (रा. उमापूर) व वाहन मालक शेख अहमद शेख महंमद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या नाझीम करीम सौदागर (रा. उमापूर) याच्याकडून १,०२,००० किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तिसऱ्या कारवाईत खळेगाव-गेवराई रस्त्यावर संशयित व्यक्तीची तपासणी केली असता १८० मिलीच्या १९२ बाटल्या, ९० मिलीच्या ५० बाटल्या देशी दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच-२३ बीबी-३३९० क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली. या कारवाईत ६६,७०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या तिन्ही कारवायांमध्ये एकूण ३१,९८,७०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्हाडकर तसेच पोलीस अंमलदार हनुमान इंगोले, संदीप गायकवाड आणि सफौ जमादार यांनी केली.

COMMENTS