१०० हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन सुपा : अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य सा

१०० हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन
सुपा : अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुपा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
पारनेर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी सरपंच तथा तालुका दूध संघाचे अध्यक्ष दत्ता पवार, माजी सरपंच योगेश रोकडे, अमोल मैद, सचिन शेळके, लहुजी भालेकर, संदीप देशमुख, अनिल जवक आणि मोहन लोणकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या विशेष पुढाकारातून या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी पारनेर तालुक्यातील विविध भागांतून नागरिक, तरुण, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनीही या सामाजिक उपक्रमात हिररीने भाग घेत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रक्तदान हे सर्वोत्तम दान असल्याने सामाजिक जाणीव जपत शिबिर यशस्वी केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

COMMENTS