Homeताज्या बातम्या

महावितरणाचा हलगर्जीपणा; श्रीगोंदा स्टेशन रोडवर चिंचेच्या छाटलेल्या फांद्यांमुळे अपघाताचा धोका, नागरिक संतप्त

श्रीगोंदा : शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या स्टेशन रस्त्यावर वीजवाहिन्यांना अडथळा ठरणार्या चिंचेच्या झाडाच्या फांद्यांची छाटणी महावितरणकडून करण्यात

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुपा येथे रक्तदान शिबीर;
शिर्डी साईबाबा संस्थानचे वार्षिक उत्पन्न ६३८ कोटी; सोन्या-चांदीच्या देणगीत यंदा लक्षणीय वाढ
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची ५४२ प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लावा : आ. विवेकभैय्या कोल्हे

श्रीगोंदा : शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या स्टेशन रस्त्यावर वीजवाहिन्यांना अडथळा ठरणार्या चिंचेच्या झाडाच्या फांद्यांची छाटणी महावितरणकडून करण्यात आली आहे. मात्र, छाटणीनंतर या मोठ्या फांद्या रस्त्याच्या कडेला आणि काही ठिकाणी थेट रस्त्यावरच तशाच टाकून देण्यात आल्याने येथे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा ढिसाळ कारभार सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्टेशन रस्ता हा शहरातील प्रमुख मार्ग असून यावरून दुचाकी, चारचाकी वाहने तसेच पादचार्यांची मोठी वर्दळ असते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. मात्र, त्यानंतर रस्त्यावर पडून राहिलेला हा कचरा आणि फांद्या हटविण्याबाबत महावितरण किंवा संबंधित यंत्रणेने कोणतीही दखल घेतलेली नाही.

रस्त्याच्या वळणावरच या फांद्या पडल्या असल्याने वाहनचालकांना अचानक आपली वाहने वळवावी लागत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात या फांद्या स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. “अपघात झाल्यानंतर जाग येण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी,” अशी अपेक्षा स्टेशन रस्ता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील हे अडथळे तातडीने दूर करून साफसफाईची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS