रयत शिक्षण संस्थेचे अधिकृत पत्र प्रदान जामखेड : रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या कन्या विद्यालय (जामखेड) येथील स

रयत शिक्षण संस्थेचे अधिकृत पत्र प्रदान
जामखेड : रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या कन्या विद्यालय (जामखेड) येथील स्कूल कमिटी (शाळा समिती) सदस्य म्हणून जामखेडचे सुपुत्र अमोल जगन्नाथ राळेभात यांची निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने नुकतेच त्यांना याबाबतचे अधिकृत पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले अमोल राळेभात यांची ही निवड १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जामखेड शाखेच्या सर्वांगीण आणि गुणात्मक विकासासाठी मोठे योगदान लाभेल, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेने पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
अमोल राळेभात हे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्यरत असून, आता रयत शिक्षण संस्थेसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संस्थेत त्यांना काम करण्याची संधी मिळाल्याने शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे. “आमदार रोहित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे, त्यांचा हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन,” अशी प्रतिक्रिया अमोल राळेभात यांनी निवड झाल्यानंतर व्यक्त केली.

COMMENTS