Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह लवकरच भारत दौर्‍यावर

नवी दिल्ली : नेपाळमध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर देशांतर्गत सुधारणा आणि परराष्ट्र धोरण या दोन्ही आघाड्यांवर वेगवान घडामोडी सुरू झाल्या आह

भारताला नरक म्हटल्याने काँगे्रस आक्रमक; 140 कोटी भारतीयांचा अवमान म्हणत पंतप्रधान मोदींवर केली टीका
ट्रम्प यांचा यू टर्न; इराणसोबत करार करण्याचे संकेत
वंदे मातरमला राष्ट्रगीतासारखा समान दर्जा; मंत्रिमंडळाची मंजुरी; अवमान केल्यास, गायनात अडथळा आणल्यास शिक्षा आणि दंड
Nepal's Newest And Youngest Prime Minister Balen Shah To Visit India,  Accepts PM Narendra Modi's Invite – RNA – Research, News & Analysis

नवी दिल्ली : नेपाळमध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर देशांतर्गत सुधारणा आणि परराष्ट्र धोरण या दोन्ही आघाड्यांवर वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह लवकरच भारत दौर्‍यावर येणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी दिली.
दोन्ही देशांच्या परराष्ट्र विभागांकडून या दौर्‍याची तयारी सुरू असून, पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाह यांचा हा पहिलाच महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दौरा मानला जात आहे. याआधी जून 2023 मध्ये माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी भारताचा अधिकृत दौरा केला होता. काठमांडू येथे नव्या सरकारने शंभर मुद्द्यांचा व्यापक सुधारणा आराखडा राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासन अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना दिलासा देणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. या आराखड्यात विशेष सवलतींच्या संस्कृतीला आळा घालणे, शासकीय कामकाजातील विलंब कमी करणे, गरजूंसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे तसेच बालकांसाठी तणावमुक्त शिक्षण व्यवस्था उभारणे यांसारख्या उपायांचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राजकीय हस्तक्षेपाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षण संस्थांना केवळ अध्ययनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर दिला जात आहे. पुढील नव्वद दिवसांत विद्यार्थी संघटनांमधील राजकीय प्रभाव संपवून त्याऐवजी अपराजकीय विद्यार्थी परिषदांची स्थापना करण्याचे नियोजन आहे.
याशिवाय, केंद्र सरकारच्या मंत्रालयांची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शासकीय संस्थांमधील राजकीय हस्तक्षेप कमी करून प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एकूणच, नेपाळ सरकार देशांतर्गत सुधारणा वेगाने राबवत असताना भारतासारख्या महत्त्वाच्या शेजारी देशाशी संबंध अधिक दृढ करण्यावरही भर देत आहे. आगामी भारत दौर्‍यात द्विपक्षीय सहकार्य, व्यापार, पायाभूत सुविधा आणि सीमाविषयक प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS