Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस बियाणे विकणाऱ्यांवर  कडक कारवाई करा : आ.मोनिका राजळे

पाथर्डी :  बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या दोषीं खतविक्रेत्यांवर कडक कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे देण्यात यावे असे आवाहन

 सहकारभारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी हजारे
अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अनारसे
Monika Rajale : बोगस बियाणे व खतांवर कडक कारवाई करा : आमदार राजळे | I Love  Nagar | News Portal

पाथर्डी :  बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या दोषीं खतविक्रेत्यांवर कडक कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे देण्यात यावे असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. 

तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या  खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय डमाळे, तहसीलदार उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, नंदकिशोर थोरे, वैभव थोरे, संकेत कराळे, फर्टीलायझर असोसिएशनचे सतीश मुनोत, राजेंद्र साप्ते, ललित खेडकर, अंकुश कासुळे, दत्तात्रय पठाडे हे उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या की, कृषी विभागाकडून होणारे बियाण्यांचे वाटप पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे.केवळ उपक्रम न राबवता शासनाच्या योजनेचा  प्रत्यक्ष लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचणे महत्वाचे आहे.खरीप हंगामाची तयारी ही कागदावर न दिसता प्रत्यक्षात राबवली गेली पाहिजे.सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी होईल. बियाणे व खतांचा तुटवडा, तसेच डुप्लिकेट मालाचा प्रश्न निर्माण होऊ नये  यासाठी कृषी विभागाने विशेष दक्षता घ्यावी. योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सर्व यंत्रणांनी करावे अशी अपेक्षा राजळे यांनी व्यक्त केली. या वेळी शासनाच्या विविध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक मिळवलेल्या शेतकऱ्यांना राजळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.प्रास्ताविक महादेव लोंढे सूत्रसंचालन विशाल साबदे तर आभार नंदकिशोर थोरे यांनी मानले.

COMMENTS