भोकर - मुदखेड रोड येथील बिरसा मुंडा चौकाचे नगरपरिषदेच्या वतीने नजीकच्या काळात शुशोभीकरण करणार असल्याची घोषणा नगरपरिषदेचे अध्यक्ष भगवानराव दंडवे य

भोकर – मुदखेड रोड येथील बिरसा मुंडा चौकाचे नगरपरिषदेच्या वतीने नजीकच्या काळात शुशोभीकरण करणार असल्याची घोषणा नगरपरिषदेचे अध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी केली. तालुक्यातील मूळ आदिवासी बंधू-भगिनींच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी भोकरचे नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अशोक माझळकर, प्रा. डॉ. कमलताई फोले, माजी संचालक धोंडीबा भिसे, माजी सभापती शिवाजी देवकुळे, माजी सरपंच धोंडीबा देशमुखे, संचालक कृष्णा वागदकर, बापुराव वागदकर, पुंडलीकराव वागदकर, चंपतराव मेंडके, परमेश्वर वागदकर, पांडूरंग गामोड, बालाजी कोठुळे, गजानन देशमुखे, माधवराव माझळकर, चिमणाजी वागदकर, साईनाथ हुरदुके यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS