Homeताज्या बातम्या

भगवान गायकवाड यांना ‘युवा आंबेडकरवादी समाजभूषण पुरस्कार’ प्रदान; नांदेड येथील साहित्य संमेलनात गौरव

नांदेड : आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते तथा ज्येष्ठ समाजसेवक भगवान गायकवाड यांना नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलन

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड काँग्रेसचा विजय मार्च; ’लोकशाहीचा विजय’ असल्याचा दावा
मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार; गाढवांसह तहसीलवर धडक देत सरकारच्या धोरणांचा निषेध
आसूड मोर्चातून काँग्रेसचा सरकारविरोधात हल्लाबोल; नांदेडमध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

नांदेड : आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते तथा ज्येष्ठ समाजसेवक भगवान गायकवाड यांना नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात ‘युवा आंबेडकरवादी समाजभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित या संमेलनात अंजलीताई आंबेडकर, खासदार रवींद्र चव्हाण, फारुख अहमद, प्रशांत इंगोले आणि कवी नितिन चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भगवान गायकवाड हे गेल्या तीन दशकांपासून आंबेडकरी चळवळ, धम्मकार्य आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले असून सामूहिक विवाह मेळावे, रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजहिताचे कार्य केले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सत्यशोधक विचार मंचाने नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनात त्यांना ‘युवा आंबेडकरवादी समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविले.

हा पुरस्कार जाहीर होताच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळातील सुभाष काटकांबळे, नंदू बनसोडे, किशोर आटकोरे, शिलारत्न चावरे, पद्माकर सोनकांबळे, राजू कदम आदींनी भगवान गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. समाजहितासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्याची ही योग्य दखल असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

COMMENTS