Homeताज्या बातम्या

संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

 अहिल्यानगर  : राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्या एचटीबीटी (बोलगार्ड-3) कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट कोपरगाव श

व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
माजी खा. विखे यांचा अकोलेकरांकडून सन्मान  
परिवहन मंत्र्यांनी प्रथम बससह कर्मचाऱ्यांची पूर्तता करावी : श्रीगोड
HTBT Seeds: अनधिकृत बियाण्यांनी व्यापला ५०% कापूस बाजार – शेतकऱ्यांच्या  फसवणुकीत मोठी वाढ


 अहिल्यानगर  : राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्या एचटीबीटी (बोलगार्ड-3) कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट कोपरगाव शहर पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आले आहे. या कारवाईत 60 कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून सुमारे 54 हजार 60 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आणि तंत्र अधिकारी निलेश गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोपरगाव तालुक्यात संशयास्पद कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर बियाणे नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी स्वतः डमी ग्राहक बनून तपास सुरू केला.  
पोलीस चौकशीत आरोपीने जळगाव जिल्ह्यातील भगवती सीड्स, चोपडा येथून विनापरवाना बियाणे मागवत असल्याची कबुली दिली. ही बियाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसमार्गे पार्सल सेवेद्वारे पाठवली जात असल्याचेही समोर आले.

COMMENTS