अहमदनगर : पत्रकार कुटुंबीयांचा दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर : पत्रकार कुटुंबीयांचा दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)-  समाजात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. तणावपुर्ण व्यस्त जीवन जगताना समाजात व कुटुंबात चांगले संबंध निर्माण करण्यासाठी पंच

संस्थेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने सुखावलो : रामकृष्ण भिंगारे
नामदार थोरात यांनी केली गंगामाई घाट परिसराची पाहणी
स्व. वसंतराव झावरे पाटील कोव्हिड सेंटरमध्ये विश्वशांती लोककल्याण यज्ञाचे आयोजन | आपलं नगर | LokNews24

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

समाजात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. तणावपुर्ण व्यस्त जीवन जगताना समाजात व कुटुंबात चांगले संबंध निर्माण करण्यासाठी पंचसूत्रीचा उलगडा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केला.  

पत्रकार समन्वय समिती, मराठी पत्रकार परिषद, केडगाव प्रेस क्लब, प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी दिवाळी पाडव्याला फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळेपणे संवाद साधताना अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी भोसले बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष बाबा जाधव, सुभाष चिंधे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मन्यार आदींसह पत्रकार, छायाचित्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी कुटुंबीयांसह उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी भोसले यांनी चांगला वेळ देणे, केलेल्या कामाबद्दल कौतुकाची थाप देणे, भेटवस्तू देणे, व्यक्तींची काळजी घेणे, उत्तम कामाबद्दल प्रशंसा करणे या पंचसूत्रीने कुटुंबासह समाजात देखील चांगले संबंध निर्माण करता येतात. चांगले संबंध प्रस्थापित झाल्यास परिवारासह समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील हॉटेल फरहत येथे झालेल्या पत्रकार कुटुंबीयांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रास्ताविकात सुभाष चिंधे यांनी कोरोना महामारीत प्रशासन व पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन पत्रकारांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन काम केले. कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व पत्रकार कुटुंबीय दिवाळीच्या फराळ कार्यक्रमात एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन देशमुख यांनी कोरोनाकाळात व जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या संकटकाळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले. बाबा जाधव यांनी समाजासाठी काम करणार्‍या ज्या पत्रकारांसाठी कोणी करत नाही, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. नेहमीच धावपळ व तणावपुर्ण जीवन जगणार्‍या पत्रकारांसाठी विरंगुळा म्हणून सर्व कुटुंबीयांना एकत्र आणण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, कामाच्या तणावामुळे पोलीस व पत्रकारांना आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ देता येत नाही. मात्र कुटुंबीयांसाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. वाढते काम, स्पर्धेचे आव्हान यामुळे पत्रकारांचे जीवन तणावपुर्ण बनले असून, पोलीसांपेक्षा मोठी जबाबदारी पत्रकार पार पाडत असतात. समाजासमोर सत्य आणून आरसा उभे करण्याचे काम पत्रकार करतात. काहींच्या त्यागामुळे समाज चांगला होण्यास मदत होते. कुटुंबीयांच्या प्रेरणे व सहकार्याने हे काम शक्य होत असून, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस व पत्रकारांनी त्यांचा देखील विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जाहिरात संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल मुथा, नितीन देशमुख, अनिल हिवाळे, योगेश गुंड, प्रमोद पाठक, संदीप दिवटे, संजय गाडिलकर, अशोक तांबे, अल्ताफ शेख, अन्सार सय्यद, निलेश आगरकर, वाजिद शेख, लहू दळवी, आफताब शेख, सुधीर पवार, उदय जोशी, शब्बीर शेख, महेश कांबळे, बबन मेहेत्रे, विजय मते, आबिद खान, नरेश रासकर, बाबा ढाकणे, गणेश देलमाडे, रामदास बेद्रे, शब्बीर शिकीलकर, गणेश उनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कराळे यांनी केले. आभार केदार भोपे यांनी मानले.

COMMENTS