Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजारामबापू सहकारी बँकेस 36.48 कोटींचा नफा : शामराव पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू सहकारी बँकेला 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 36 कोटी 48 लाखांचा ढोबळ नफा झाला असून निव्वळ एनपीए शून्य

आयटी पार्क खोटच आहे म्हणूनच आमदारांनी किरण काळें समोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला
पुणे येथे लष्करी अधिकारी महिलेची आत्महत्या; वरिष्ठा विरोधात गुन्हा दाखल
त्रिशंकू भागातील पथदिवे बंद ठेवून विज बचतीचा सातारा नगरपरिषदेकडून संदेश

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू सहकारी बँकेला 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 36 कोटी 48 लाखांचा ढोबळ नफा झाला असून निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश आले असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी दिली. राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या गत आर्थिक वर्षाचा आढावा पत्रकार परिषदेत घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष जनार्दन पाटील, कार्यकारी संचालक पी. एन. बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. शामराव पाटील म्हणाले, बँकेला झालेल्या ढोबळ नफ्यातून संशयित व बुडित निधीसाठी अतिरिक्त 15 कोटींची तरतूद केली आहे. तसेच आयकर तरतूद 3 कोटी 25 लाख इतकी केली आहे. बँकेकडे 2086.26 कोटी इतक्या ठेवी असून 1395.89 कोटी इतका कर्ज पुरवठा केला आहे. 3482 कोटी व्यवसाय झाला आहे. बँकेचा ठेव कर्जाचा रेशो 67 टक्का इतका आहे. भागभांडवल 46.07 कोटी असून स्वनिधी 244 कोटी आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्तता निधी 12.35 टक्के इतका आहे. बँकेकडे 385 कर्मचारी कार्यरत असून प्रति सेवक व्यवसाय 9.04 कोटी इतका आहे. कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी 2 कोटी रूपये सानुग्रह अनुदानाची तरतूद केली आहे. सध्या बँकेने शेतकर्‍यांसाठी दिली जाणारी शेती व शेतीपुरक मुदती कर्जे व सोनेतारण, वैयक्तीक वापरासाठी चारचाकी, प्लॅट व घरबांधणी तसेच डॉक्टरांसाठी दिली जाणारी मशिनरी, अ‍ॅब्युलन्स खरेदी व इतर साहित्य खरेदी, हॉस्पिटल बांधकाम, रिन्युवेशन तसेच इंडस्ट्रीअल, मशिनरी व कॅश क्रेडीट इत्यादी कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. कोरोनाच्या संकटाचा फटका वित्तीय संस्थांना बसला आहे. अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. कर्जाला मागणी कमी आहे. दिलेली कर्जे वसूल होण्यामध्ये अडचणी आल्या. त्यामुळे बँकांचा एनपीए वाढला नफा क्षमता कमी झाल्याचेही पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी संचालक विजयराव यादव, प्रल्हाद कुलकर्णी, धनाजी पाटील, डॉ. प्रकाश पाटील, संजय पाटील, माणिक पाटील, शिवाजी मगर, सुभाष सुर्यवंशी, अनिल गायकवाड, आनंदा लकेसर, अ‍ॅड. संग्राम पाटील, जगन्नाथ स्वामी, जयकर गावडे, प्रशांत पाटील, संभाजी पाटील, नामदेव मोहिते, संचालिका प्रा. दीपा देशपांडे, चिफ जनरल मॅनेजर आर. ए. पाटील, डेप्यु. जनरल मॅनेजर एस. आर. पाटील व अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS