Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजिंक्यतारा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

सातारा / प्रतिनिधी : अर्जाच्या छाननीत शेतकरी संघटनेचे चार व एका अपक्षाचा अर्ज अवैध ठरल्याने 21 जागांसाठी 21 अर्ज राहिल्याने अजिंक्यतारा सहकारी सा

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पाचगणी पालिका प्रथम: स्वच्छता पुरस्कारात पांचगणी नगरपरिषदेची मांदियाळी
सातार्‍यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी
त्रिपुडी येथील सोन्या नावाच्या चंद्रकोर बोकडाला 23 लाखाची बोली

सातारा / प्रतिनिधी : अर्जाच्या छाननीत शेतकरी संघटनेचे चार व एका अपक्षाचा अर्ज अवैध ठरल्याने 21 जागांसाठी 21 अर्ज राहिल्याने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणास्तव अवैध ठरविल्याने या विरोधात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये राखीव जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी बिनविरोध झाले आहेत. पण, गोवे, चिंचणेर, नागठाणे ऊस उत्पादक गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एका अपक्षाने अर्ज दाखल केले होते. आज दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाली. यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे चार व एका अपक्षाचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. छाननीत अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये नागठाणे गट : अरुण निकम, चिंचणेर गट : राजेंद्र बर्गे, भिकू शेळके, दत्तात्रय शिंदे, गोवे गटातून अर्जुनराव साळुंखे यांचा समावेश आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणास्तव अवैध ठरविले आहेत. त्यामुळे या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले.

COMMENTS