Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगाव न्यायालयासाठी 60 लाखांचा निधी मंजूर

कोरेगाव / प्रतिनिधी : कोरेगाव येथील न्यायालयाच्या इमारतीच्या कामासाठी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मा

सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक

कोरेगाव / प्रतिनिधी : कोरेगाव येथील न्यायालयाच्या इमारतीच्या कामासाठी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतल्याची माहिती कोरेगाव तालुका बार असोसिएशनतर्फे देण्यात आली.
कोरेगाव येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाच्या मंजुरीसाठी आ. शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान, कोरोनामुळे निधीअभावी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम रखडल्याच्या पार्श्‍वभूमीवर बार असोसिएशनतर्फे अ‍ॅड. जयवंतराव केंजळे, अ‍ॅड. टी. आर. पवार, अ‍ॅड. अशोककुमार वाघ, अ‍ॅड. बारसावडे, अ‍ॅड. निलेश झांजुर्णे, अ‍ॅड. भैय्यासाहेब जगदाळे, अ‍ॅड. पी. सी. भोसले, अ‍ॅड. रणजित भोसले यांनी काही दिवसांपूर्वी आ. शिंदे यांची भेट घेतली होती. कोरेगाव येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या निधी अभावी बंद आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व नवीन इमारत वापरात आल्यानंतर पक्षकारांची गैरसोय दूर होणार असल्याचे सांगितले होते.
वास्तुकलेचा अव्दितीय नमुना असलेली जुनी सन 1923 मध्ये बांधलेली इमारत सुस्थितीत आहे. परंतू सध्या अपुरी पडत आहे. सध्या या ठिकाणी तीन न्यायाधीश कामकाज करतात. वकील संघाच्या सदस्यांची संख्या सुमारे 150 आहे. या पार्श्‍वभूमीवर निधी अभावी बंद असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकामास तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. त्यामध्ये सुसज्ज फर्निचर, अद्ययावत संगणक प्रणाली, सुसज्ज संगणकीय ग्रंथालय या बाबी विचारात घेण्यात याव्यात. त्याचबरोबर जुन्या इमारतीची लवकरच शतकपूर्ती होणार असल्याने या पुरातन वास्तूच्या पुनर्निर्माणासाठीही भरीव निधीची तरतूद करून 2021-22 पर्यंत नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची विनंती या पदाधिकार्‍यांनी केली होती.
त्यावर न्यायालयाच्या इमारतीचे काम पुन्हा सुरू करण्याबरोबर न्यायालयाची जुनी इमारत हेरिटेज म्हणून जतन करण्याच्या दृष्टीने इमारतीच्या नूतनीकरणासह न्यायालयाच्या आवारातील मंजूर कामे पूर्णत्वास नेली जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध दिला जाणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार कोरेगाव येथील न्यायालयाच्या इमारतीच्या कामासाठी आ. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 60 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती कोरेगाव तालुका बार असोसिएशनने दिली.

COMMENTS