Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचा विचार देशाला प्रगतीकडे नेणारा : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड / प्रतिनिधी : काँग्रेसने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला जातीयवादी पक्षांकडून फाटा देत देशात जातीय दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उद्या युवा महोत्सव
पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहकांकडे 12 हजार कोटीचे थकले वीजबिल
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

कराड / प्रतिनिधी : काँग्रेसने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला जातीयवादी पक्षांकडून फाटा देत देशात जातीय दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला रोखण्यासाठी व देशाला एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेसने नोंदणी अभियान हाती घेतले आहे. काँग्रेसचाच एकसंघ विचार भारत देशाला प्रगतीकडे नेणारा आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड दक्षिण काँग्रेसतर्फे शहर व परिसरात डिजिटल नोंदणी अभियानास आजपासून प्रारंभ झाला. त्यावेळी आ. चव्हाण बोलत होते. आमदारांच्या हस्ते नोंदणीस सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम येडगे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्याताई थोरवडे, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, इंग्रजांनी देश लुटून नेल्यानंतर तो समृध्द करण्यासाठी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यानंतर काँग्रेसच्या सर्व नेतृत्वांनी देशास समृध्द करत देशातील जनतेला एकसंघ ठेवले. परंतू, आता जातीयवादी पक्षांचा देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील जनतेला एकसंघ ठेवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविणार आहे. त्याची व्याप्ती बूथ स्तरापर्यंत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उदयसिंह पाटील-उंडाळकर, मनोहर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्ष विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.

COMMENTS