Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पन्नास हजारांचं अनुदान लाटण्याचा प्रकार समोर

 बीड प्रतिनिधी - नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झालंय. मात्र बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरून प

नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
लोकशाहीतील दुबळ्या झोळ्या !
 कंटेनर मधून आला ब्लॅक इग्वांना

 बीड प्रतिनिधी – नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झालंय. मात्र बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर हे पन्नास हजारांचं अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान याबाबत वारंवार जिल्हा बँकेकडे विचारणा केली असता उडवाउडुचे उत्तर शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. चौसाळा जिल्हा मध्यवर्ती बँकेत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजनेअंतर्गत, अनुदान आले होते. माञ बीड तालुक्यातील गोलंगरी गावातील जवळपास सहा पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांवरून पन्नास हजारांचे अनुदान परस्पर उचलण्यात आलंय. याची चौकशी करून लाटलेले अनुदान मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

COMMENTS