Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावठी पिस्तुलातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

अमळनेर (जळगाव) : शहरातील अमलेश्‍वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत गावठी पिस्तुलातून चुकून सुटलेल्या गोळीमुळे 35 वर्षीय

बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यूअंमळनेरजवळील घटना ; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश
राज्यात एटीएसने टाकले छापासत्रदेशविरोधी कारवायांमुळे मुंबई, पुणे, नाशिक, नांदेडमध्ये कारवाई

अमळनेर (जळगाव) : शहरातील अमलेश्‍वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत गावठी पिस्तुलातून चुकून सुटलेल्या गोळीमुळे 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अरुण सुरेश महाजन असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मंडप व्यवसायाशी संबंधित होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अरुण महाजन आपल्या काही मित्रांसह माळीवाडा परिसरात गप्पा मारत बसला होता. यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन हा आपल्या जवळ असलेल्या गावठी पिस्तुलाबाबत माहिती देत होता. पिस्तुल हाताळत असतानाच अचानक त्यातून गोळी सुटली आणि ती थेट अरुण महाजन यांच्या छातीत जाऊन लागली. गोळी लागल्यानंतर अरुण महाजन गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्याला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी भूषण महाजन याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिकदृष्ट्या हा निष्काळजीपणामुळे घडलेला प्रकार वाटत असला, तरी पोलिस विविध शक्यतांच्या आधारे तपास करत आहेत. संबंधित पिस्तुल कोठून मिळाले, ते बेकायदेशीररीत्या का बाळगले होते, तसेच गोळी सुटण्यापूर्वी काही वाद झाला होता का, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर शस्त्रांच्या वाढत्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS