Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेष्ठाच्या न्याय, हक्क सेवेसाठी सदैव कटिबध्द : न्या डॉ.सय्यद वाहब; लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रमात कायदेविषयक शिबिर

बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था पोखरी संचलित लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रम घाटसावळी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीन

घाटसावळीत ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जल्लोषवृद्धाश्रम, व्यसनमुक्ती केंद्र, वृक्षसंवर्धन व विद्यार्थ्यांना मदतीचा हात
जनसेवा हीच ईश्वर सेवा.-प्रकाश चोले; फळ वाटप करुन वाढदिवस साजरा
घाटसावळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरायोग समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली – चंद्रकांत फड

बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था पोखरी संचलित लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रम घाटसावळी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने एक दिवसीय कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव फड हे उपस्थित होते तर विशेष उपस्थिती न्या डॉ सय्यद वाहब हे उपस्थित होते .सोबत ओ एस शिंदे साहेब व पि एल यु व सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे हे होते.
कार्यक्रमाच्या आरंभी संस्थेच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
शिबीरात पुढे बोलताना न्या डॉ सय्यद वाहब म्हणाले जेष्ठ नागरिकांच्या समस्या अडी अडचणी अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर राहील तर तत्वशिल कांबळे म्हणाले आपल्या न्याय व हक्कासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत राहु
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत फड यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नितिन फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहदेव फड,, सतिश फड ,रामनाथ मुळे, अमोल नेहरकर, कौटुंबिक सल्लागार वर्षा शेरकर यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.आजिनाथ शेरकर यांनी केले.

COMMENTS