Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरे ला कारे करत जाब विचारा : रुपालीताई चाकणकर

पाडेगाव : कोरोना काळात आरोग्य सेवेचा भाग म्हणून काम केलेल्या महिलांच्या सत्कारप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर व व्यासपीठावर स

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती
ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे येऊ शकते तिसरी लाट
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

बाईच्या आधी आपण माणूस आहोत ही जाणीव समाजाला व्हावी
लोणंद / प्रतिनिधी : आपल्या आजूबाजूला कोणत्याही व्यक्तीवर अन्याय अत्याचार होत असेल तर आपण राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी.न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील महिलेला न्याय मिळावा. ज्या माझ्या भगिनी कार्यालयात येऊ शकत नाहीत. अशा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी धुळे, गडचिरोली, जळगाव, पालघरला जाऊ शकते. अनेक जिल्ह्यामधून जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून त्या महिलांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. यानिमित्ताने तुम्हा सर्वाना विनंती आहे की, आपल्या आजूबाजूला जर अशा घटना घडत असतील तर निश्‍चितपणे अरे ला कारे करत त्याला जाब विचारा. कारण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ही तुम्हाला या निसर्गाने, संविधानाने दिलेला आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केले.
त्या पाडेगाव (नेवसेवस्ती) ता. फलटण येथे पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महापुरुष जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी संघर्ष रणरागिणी लताताई खरात होत्या. तसेच पाडेगावच्या सरपंच स्मिताताई खरात, उपसरपंच राणीताई नेवसे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली नेवसे, शीतल बनकर, राजश्री बोराटे व मान्यवर तसेच बहुसंख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, बाई असले तरी बाई नंतर आहे. बाईच्या आधी आपण माणूस आहोत. ही जाणीव समाजाला व्हावी. हे मनापासून वाटते. या राज्य महिला आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील महिला भागिनीना सुरक्षिततेचा आत्मविश्‍वास देण्याच्या दृष्टीने आपण काम करत आहोत. ज्या रायगडावर हिरकणीचा सन्मान छत्रपती शिवरायांनी केला. आज सुध्दा आम्हाला या सन्मानाची गरज वाटते. आजही आम्हाला छत्रपती शिवरायांचा विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. हा विचार मनामध्ये रुजवत असताना युवकांची संख्या फार मोठी आहे. हा विचार रुजवत असताना युवकांची भूमिका खूप महत्वाची आहे. निश्‍चितपणाने हे युवक करू शकतात. व्याख्यानमालेच्या वतीने एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांकडून होत आहे. कोरोना काळात ज्यांनी कार्य केले असे आरोग्य परिचारिका, आशाताई, अंगणवाडी सेविका या महिलांचा सन्मान रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रुपालीताई चाकणकर यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले. शिवाय पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशन यांच्या उपक्रमाबद्दल रुपालीताई चाकणकर यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS