तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड येथे पोलीस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्षचा शुभारंभ
शेतकर्‍यांच्या परवानगीनेच कृषी कायदे लागू होणार ; मंत्री सत्तार यांची ग्वाही

औरंगाबाद: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस घ्यावी असे अवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लसीकरण अभियान उदघाटन प्रसंगी केले. आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याने  कोणीही लसीकरण पासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी व्यक्त केली. दरम्यान लसीकरणाची ही मोहीम सुरूच असणार असून येत्या 15 दिवसांत मतदारसंघात 100 टक्के लसीकरण करण्याचा निर्धार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.

शहरातील नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ पार पडला. यावेळी जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सुचनेनुसार सिल्लोड व  सोयगाव तालुक्यात आयोजित मोफत कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिल्लोड शहर व ग्रामीण भागात नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत लसीकरण करून घेतले. लसीकरण करते वेळी गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाकडून  नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.  बजाज ग्रुपच्या सहकार्याने या अभियानासाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना लसीचे महत्व पटवून देत म्हणाले की,  भविष्यातील धोका पाहता आजच  लस घेणे आवश्यक आहे. कोरोना लस घेतलेली नसल्यास प्रवास करता येणार नाही तसेच लस न घेतलेल्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. बजाज ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आपला उद्योग व्यवसाय केला. कोरोनाच्या संकटात बजाज ग्रुपने कोरोना लसीचा पुरवठा करून दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बजाज ग्रुप चे आभार व्यक्त केले.

लस पूर्णपणे सुरक्षित – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

लस घेतल्यानंतर कोरोनाच्या आजारातून लवकर बरे होता येते, लसीचे कवच कुंडल असेल तर कोरोना झाला तरी सुरक्षित यावर मात करू शकाल असे स्पष्ट करीत लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्तपणे साथ देऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याप्रसंगी केले. सिल्लोड आणि सोयगाव लसीकरणात मागे आहे नक्कीच ही गोष्ट भुषणावह नाही. त्यामुळे आता ह्या महालसीकरण मोहिमेमध्ये जनतेनी सहभाग नेांदवून आपल्या तालुक्यात 100 टक्के लसीकरण करुन घ्यावे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांचे उदाहरण देऊन कोरोना लसीचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

COMMENTS