राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान

अतिवृष्टीने 1 लाख 21 हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचा चुराडा

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात गेल्या 7-8 दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमूळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विद

पावसाची हुलकावणी,शेतकर्‍याचे डोळे आभाळाकडे
खंडाळ्यात आढळले दुर्मीळ वाघाटी रानमांजर
देशात यंदा एल निनोमुळे अपुरा पाऊस

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात गेल्या 7-8 दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमूळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील कित्येक जिल्ह्यात पावसाने नद्या इशारा पातळी आणि धोका पातळ्या गाठल्या आहेत. यामुळे नदी किनार्‍यावर असणार्‍या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 लाख 21 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यात गेल्या 13 दिवसांमध्ये 355 पैकी 270 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. अतिपावसामुळे आतापर्यंत 1 लाख 21 हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान हा पाऊस न थांबल्यास सरकारला ओला दुष्काळ जाहीर करावा लागण्याची शक्यता आहे. अशी भीती कृषी विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. राज्यात बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. याशिवाय 24 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस झालेला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा राज्यातील अतिपावसाच्या क्षेत्रात मोडतो. मात्र, यंदा तेथे अजूनही चांगला 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याची माहिती आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी राज्यात सरासरी 41.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 1004 मिलिमीटर पाऊस होत असतो. त्यापैकी आतापर्यंत 429.8 मिलिमीटर (42.8 टक्के) पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 392 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मान्सून अपेक्षेपेक्षाही जादा झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, अतिपावसामुळे आतापर्यंत 14 जिल्ह्यांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. 1.21 लाख हेक्टरवरील पिके आतापर्यंत बाधित झाली असून, हा आकडा पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड व अमरावती जिल्ह्यांत झाले आहे. नांदेड भागातील 36 हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस व फळपिकांची हानी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 27 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा व इतर पिके वाया गेली आहेत. याशिवाय अतिपावसाने 1149 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. वर्धा जिल्ह्यात 16 हजार तर चंद्रपुरात 10 हजार हेक्टरवर खरीप पिकांना पावसाने तडाखा बसला आहे.

13 दिवसांत 99 जणांचा मृत्यू
राज्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 13 दिवसांत आतापर्यंत 99 जणांना अतिवृष्टीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर 181 जनावरे दगावलीत. तर आजवर 8 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट देण्यात आला.

COMMENTS