लोणी : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कृषी महाविद्यालय, लोणीच्या कृषिकन्यांचे आगमन झाले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

लोणी : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कृषी महाविद्यालय, लोणीच्या कृषिकन्यांचे आगमन झाले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या विद्यार्थिनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत व महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी महाविद्यालय, लोणी येथे शिक्षण घेणाऱ्या रोहिणी नवले, प्रेरणा भोसले, तन्वी नांगरे, समीक्षा शिंदे, युक्ता पाटील व विद्या भांगरे या विद्यार्थिनी सात्रळ येथे दाखल झाल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, कृषी शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खडके, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप व प्रा. अक्षया वाळुंज यांच्या सूचनेनुसार या विद्यार्थिनी कामकाज करणार आहेत.
यावेळी सरपंच सतीश ताठे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पटेल, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल भगत, ज्ञानदेव डुकरे, संजय पलघडमळ तसेच किशोर कडू, विलास शिंदे, विठ्ठल अनाप यांच्यासह ग्रामस्थांनी कृषिकन्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषिकन्या शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान, पिकांवरील कीड व रोगांची ओळख, एकात्मिक व्यवस्थापन, तसेच आधुनिक शेती पद्धती यांची माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देणार आहेत.

COMMENTS