Homeताज्या बातम्या

चांदा येथे एकूण १३०० किलो गोमांस जप्त; सव्वा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सोनई: विभागीय रात्रगस्ती दरम्यान सोनई पोलिसांनी चांदा (कुरेशी मोहल्ला) येथे धडक कारवाई करत सुमारे १३०० किलो गोमांस जप्त केले गेल्याचे सोनई पोलिसा

हदगाव येथे भाजपची बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक २७ जून रोजी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार
TET पेपरफुटीवरून मुंबईत उग्र आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा; परळीतील दोघांसह ४० प्रवासी टपावर, ड्रायव्हर पळाला!
उध्दव ठाकरेंच्या झंझावाताचा संदेश काय? - Lokmanthan | लोकमंथन

सोनई: विभागीय रात्रगस्ती दरम्यान सोनई पोलिसांनी चांदा (कुरेशी मोहल्ला) येथे धडक कारवाई करत सुमारे १३०० किलो गोमांस जप्त केले गेल्याचे सोनई पोलिसांनी सांगितले. या कारवाईत ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २६ जुलै) पहाटे सुमारे २.०९ वाजण्याच्या सुमारास चांदा येथील कुरेशी मोहल्ल्यात ही कारवाई करण्यात आली. विभागीय रात्रगस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, चालक बोरुडे, पोलीस कॉन्स्टेबल पोपट आव्हाड व पालवे यांच्या पथकाने प्रभारी अधिकारी सपोनी अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी १ जिवंत गोवंशीय जनावर, ५०० किलो गोमांस तसेच ८०० किलो गोमांस असा एकूण १३०० किलो गोमांस जप्त केले. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.

या प्रकरणी गौस मोमीन कुरेशी व शौकत कुरेशी (रा. चांदा, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या धडक कारवाईचा पुढील तपास सपोनी अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मच्छिन्द्र आडकित्ते करीत आहेत.

COMMENTS