Homeव्हिडीओ

टेक्सासमध्ये भारतीय ध्वजाचा अवमान करत ‘इमिग्रेशन’ विरोधात निदर्शने; स्थानिक नागरिकाच्या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल

https://youtu.be/Reb4mBQGKEM अमेरिका येथील टेक्सास राज्यातील फ्रिस्को शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शहर सभागृहासमोर एका स्थानिक

फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप
होर्मुझजवळ अमेरिकेचे युद्ध हेलिकॉप्टर कोसळले
अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तरक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्‍चिम आशिया पुन्हा अस्थिर

अमेरिका येथील टेक्सास राज्यातील फ्रिस्को शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शहर सभागृहासमोर एका स्थानिक व्यक्तीने भारतीय राष्ट्रध्वज फाडून, ‘भारतीय इमिग्रेशन’ विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. उत्तर डलास उपनगरांमध्ये होणाऱ्या भारतीयांच्या वाढत्या स्थलांतराला त्याने ‘इमिग्रेशन आक्रमण’ असे संबोधले आहे. ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.फ्रिस्को शहरामध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्येचे समीकरण वेगाने बदलले आहे. सन २००० मध्ये येथे आशियाई, प्रामुख्याने भारतीय लोकसंख्येचे प्रमाण केवळ २ टक्के होते, जे आता २०२६ पर्यंत तब्बल ३३ टक्क्यांवर पोहोचले आहे. येथील बहुतांश भारतीय नागरिक हे ‘H-1B’ व्हिसावर अमेरिकेत आले आहेत. या प्रचंड वाढीमुळे स्थानिक अमेरिकन नागरिकांमध्ये नोकऱ्यांमधील स्पर्धा, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती, व्हिसा घोटाळे आणि सांस्कृतिक बदल यांबाबत तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. स्थानिक शहर परिषदेच्या बैठकांमध्येही या मुद्द्यावरून अनेकदा वाद आणि आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.दुसरीकडे, तेथील भारतीय-अमेरिकन नागरिकांनी यावर आपली भूमिका मांडताना, आपले उच्च शिक्षण, पूर्णपणे कायदेशीर स्थलांतर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मोठे योगदान या गोष्टींवर भर दिला आहे. टेक्सासच्या उपनगरांमध्ये स्थानिक आणि स्थलांतरित नागरिकांमधील वाढत असलेला हा तणाव आता अधिक चिंताजनक बनत चालला आहे.

COMMENTS