Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परराज्यातील कामगारांची नाव इथंल्या मतदार यादीत लावने म्हणजे आपल्या मातीशी बेईमानी होय- आ.धनंजय मुंडे

अंबाजोगाई प्रतिनिधी- परराज्यातील कामगारांची नावे आपल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत लावणे हे येथील मातीशी बेईमानी करणे असे

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार ः कृषिमंत्री धनंजय मुंडे
ब्रम्हवाडी गावात विकासाची गंगा – धनंजय मुंडे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’तून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

अंबाजोगाई प्रतिनिधी- परराज्यातील कामगारांची नावे आपल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत लावणे हे येथील मातीशी बेईमानी करणे असेच होईल असे स्पष्ट मत राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ते  अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकिसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करतांना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण,  विधान परिषदेचे माजी आमदार संजय दौंड,  केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे ,डॉक्टर सेलचे डॉ नरेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते राजकिशोर मोदी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मदनलाल परदेशी, शहराध्यक्ष गजानन मुडेगावकर , जी प सदस्य बाळासाहेब शेप, अमर देशमुख, प्रशांत जगताप यांच्यासह  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व उमेदवार तथा महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री योगेश्वरी देवी व हनुमान यांना श्रीफळ अर्पण करण्यात आले.
प्रचार शुभारंभ सभेचे प्रास्तविक सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनल हा शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या बाजार समितीच्या बाबतीमधील अडचणी दूर करण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे.  अंबाजोगाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही ठराविक व्यापार्‍यांचीच एकाधिकार व दंडेलशाही निर्माण झाली आहे . त्यांनी ठरवून दिलेला भावच शेतकर्‍यांना निमूटपणे घ्यावा लागत आहे. ही एकाधिकार शाही मोडित काढून शेतकरी बांधवाना त्यांच्या मालाला योग्य व स्पर्धात्मक भाव मिळवून देण्यासाठी श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवाराणा  प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी  केली. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मदनलाल परदेशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. विधान परिषदेचे माजी आमदार संजय दौंड यांनी या प्रचार सभेत श्री योगेश्वरी पॅनलच्या सर्व उमेदवांची ओळख करवून दिली. हा पॅनल आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची निवडणूक लढवीत असल्याचे सांगितले. तसेच ही निवडणूक शेतकरी बांधवांच्या मालासाठी  निर्माण केलेली पोटली पद्धत रद्द करून त्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी लढत असल्याचे नमूद केले. महाविकास आघाडीच्या वतीने निर्माण केलेल्या श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित सर्व मतदार व शेतकरी बांधवाना सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्वप्रथम त्यांनी अक्षय तृतीया निमित्त सर्व हिंदू बांधवाना व रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती ही लातूर व परळीच्या धर्तीवर काम करणार असल्याचे सांगितले. अंबाजोगाई बाजार समितीच्या मतदार यादीत ज्यांचा बाजार समितीचा दुरान्वये देखील कसलाही संबंध नसतांना देखील त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले . तसेच परराज्यातील कामगारांचा अंबाजोगाई बाजार समितीच्या मतदार यादीत नाव लावणे म्हणजेच इथल्या मातीशी बेईमानी करणे असेच होय असे परखड मत आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच ही निवडणूक ही खर्‍या अर्थाने शेतकरी, व्यापारी व हमाल मापडी यांची निवडणूक असल्याचे नमूद केले.  अंबाजोगाई बाजार समितीचा विकास हा परळी बाजार समितीच्या धर्तीवर करून शेतकर्‍यांना विवीध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अभिवाचन मुंडे यांनी याप्रसंगी शेतकर्‍यांना दिले . तसेच शेतकर्‍यांचा विमा उतरवून त्यांना विम्याचे कवच निर्माण करून देणार असल्याचे देखील आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच जनावरांच्या आठवडी बाजारासाठी सव्हे न 17 येथे जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा सर्व मतदार बांधवानी श्री योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना छत्री या निशाणीवर आपले  बहुमूल्य असे मतदान करावे असे आवाहन शेवटी आमदार धनंजय मुंडे यांनी केले. या प्रचार सभेस बबन लोमटे, शिवाजी सिरसाट , तानाजी देशमुख , पांडु तात्या हारे , गोविंद देशमुख, व्यंकटेश चामनर यांच्यासह शेकडो शेतकरी, व्यापारी व हमाल मापडी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

COMMENTS