Homeताज्या बातम्या

ठाकरे गटात पुन्हा भूकंप? खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार! लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या हालचाली सुरू; खा. राऊत तातडीने दिल्लीला रवाना

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनी वेग घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्

राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात असल्याचा मंत्री शिरसाट यांचा दावा
राज्यात शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक?; विरोधी गटातील खासदारांवर मात्र लक्ष कायम
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा उधाण; ठाकरेंच्या 2 खासदारांची शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला उपस्थिती

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वेग घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे; कारण शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र देण्याच्या तयारीत आहेत. याच दरम्यान काही खासदारांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री तथा शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्रीवरील बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावून संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेतला होता. बैठकीनंतर पक्षातील सर्व खासदार नेतृत्वासोबत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, बैठकीस काही खासदार गैरहजर राहिल्याने आणि त्यानंतर काही नेत्यांच्या हालचालींमुळे संभाव्य राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले.

मात्र, या भेटीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मतदारसंघातील एका महाविद्यालयाच्या परवानगी संदर्भातील कामासाठी ही भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. देशमुख यांनी या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही रविवारी झालेल्या बैठकीत पक्षाच्या नऊ खासदारांपैकी केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित काही खासदार अनुपस्थित राहिल्याने पक्षांतर्गत नाराजी किंवा दुरावा वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS