Homeताज्या बातम्या

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावतोय; पनवेलमध्ये शाळा प्रवेशोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

रायगड : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय शैक्षणिक परिवर्तन घडत आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या व

साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रीमंडळाची मान्यता; चार वर्षांत पूर्ण होणार काम; 1 हजार 234 कोटींचा निधी
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र

रायगड : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय शैक्षणिक परिवर्तन घडत आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे अनेक ठिकाणी पालकांचा विश्वास पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत आहे. काही भागांत खाजगी शाळांमधूनही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळताना दिसत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार रोजी केले. ते शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते.

रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील ‘पीएम श्री’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या “शाळा प्रवेशोत्सव २०२६” कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेट ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या ‘आदर्श अध्ययन केंद्राचे’ उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधत शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.

मुख्यमंत्री म्हणाले की, आजचे युग तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचे आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेली अत्याधुनिक संगणकीय अध्ययन प्रयोगशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य (Audio-Visual) माध्यमांच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामुळे शिक्षकांना अधिक प्रभावी अध्यापन करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक सोपे, समजण्यास सुलभ आणि परिणामकारक होणार आहे. ऑनलाईन परीक्षेच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन अधिक अचूकपणे करता येईल, तसेच शिक्षण प्रक्रियेला गती आणि गुणवत्ता प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संविधानिक मूल्यांची जाणीव, हक्क व कर्तव्यांची समज, स्वच्छतेची सवय, पर्यावरण संरक्षणाची भावना आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

शाळांमधून सक्षम, सुसंस्कृत नागरिक घडावेत! राज्यातील शाळांमधून सक्षम, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शिक्षण क्षेत्रातील सुधारणांचा वेग आगामी काळात आणखी वाढविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली. शाळेतील आधुनिक सुविधा, अध्ययन केंद्र आणि शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.

COMMENTS