Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोटरीच्या चंपावती भुषण पुरस्काराने पसायदानच्या गोवर्धन दराडेंचा गौरव

बीड प्रतिनिधी - सामाजिक आणि समाजाभीमुख कामात नेहमीच पुढे असलेल्या रोटरी क्लब मिड टावूनने शुक्रवारी (दि.30) प्रतिष्ठेचा चंपावती भुषण पुरस्कार देऊ

नगर जिल्यातील वयोवृद्धांना मिळणार मोफत साहित्य
इब्राहम खानचा बाप कोण आहे हे नवाब मलिक यांनी सांगावे – नितीन चौगुले (Video)
धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू

बीड प्रतिनिधी – सामाजिक आणि समाजाभीमुख कामात नेहमीच पुढे असलेल्या रोटरी क्लब मिड टावूनने शुक्रवारी (दि.30) प्रतिष्ठेचा चंपावती भुषण पुरस्कार देऊन पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे यांचा सन्मान केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
बीड रोटरी क्लब मिड टाऊनच्या वतीने वर्षभर सामाजिक आणि समाजाभीमुख उपक्रम अखंड सुरू असतात. रोटरीचे सचिव बालाजी घरत यांनी मागील वर्षातील कार्याचा आलेख मांडताना दिव्यागांना जयपुर फुटचे वितरण, संचेती हॉस्पिटलचे अस्थीरोग शिबीर, जोशी उद्यानात खेळणी, कॅन्सर निदान शिबीर, रक्तदान शिबीर असे 35 हुन अधिक उपक्रम राबवले असल्याची माहिती दिली. यावेळी अतिशय प्रतिष्ठेच्या चंपावती भुषण पुरस्काराने वंचीतांचे हक्काचे घर असलेल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे रंजना आणि गोवर्धन दराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्वत:चे घर आणि शेती विकून वंचीतांची सेवा करणारे गोवर्धन दराडे हे समाजाचे आदर्श असल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना गोवर्धन दराडे म्हणाले, सामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वाहन चालकापासून ईतर अनेक कामे केली. परंतू त्या कामात समाधान नव्हते. बीडमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुरू केले. हे हॉस्टेल चालवत असताना अनाथ, वंचीत, निराधार मुलांकडे फिस भरण्यासाठी पैस नसायचे. यातून वंचीत मुलांच्या पालन, पोषण आणि संगोपणासाठी प्रकल्प उभा करण्याची प्रेरणा मिळाली. प्रकल्प उभा करताना अर्थिक अडचणी सोबत ईतर अनेक अडचणी होत्या. परंतू समोर वंचीत मुले दिसत होती. यामुळे स्वत:चे गावातील घर आणि शेती विकून पसायदान सेवा प्रकल्प उभा केला. आज या प्रकल्पात 70 हुन अधिक मुलांचे पालन- पोषण आणि संगोपण होत आहे, याचा मनस्वी आनंद होतो. हे काम रोटरी क्लब सारख्या संस्था आणि दानशुर व्यक्तींमुळे मला शक्य झाले आहे,  अशी प्रतिक्रिया गोवर्धन दराडे यांनी व्यक्त केली. आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले परंतू मातृभूमीतील चंपावती रत्न हा पुरस्कार खुप प्रेरणा देणारा आहे, असे सांगत रोटरी क्लब आणि पदाधिकार्यांचे गोवर्धन दराडे यांनी आभार मानले. यावेळी रोटरीचे प्रातपाल रूखमेश जखोटीया, सुनिल पारख, बालाजी घरत, सुरेखा विजय माने, आदेश नहार, नितिन गोपन, राहुल बोरा, दिनेश लोळगे, ओमप्रकाश गिरी, बाजीराव ढाकणे, प्रशांत लहुरीकर, सिध्देश्वर गिरी यांच्यासह रोटरी क्लबच्या पदाधिकार्यांची मोठी उपस्थिती होती.
70 वंची मुलांचे पालन- पोषण
वंचीतांचे हक्काचे घर असलेल्या ढेकणमोह ता. बीड येथील प्रकल्पात रंजना आणि गोवर्धन दराडे हे दाम्पत्य 70 हुन अधिक मुलांचे पालन- पोषण आणि संगोपण करत आहे. हा प्रकल्प दानशुर व्यक्ती यांच्या सहयोगातून सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात परिस्थिती अतिशय गंभीर होती. या काळात दराडे दाम्पत्यांनी स्वत: उपासमार सहन करत मुलांच्या पालन- पोषण आणि संगोपणाचे शिवधनुष्य पेलले. चंपावती भुषण पुरस्काराने शुक्रवारी (दि.30) दराडे दाम्पत्याचा रोटरी क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला.

COMMENTS